शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात एक हजारापेक्षाही अधिक कृषी केंद्रांनी पाळला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 11:07 IST

राज्यभरात कृषी व्यावसायिक संघटनेने तीन दिवस बंद पाळून शासनाचे लक्ष वेधले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : बियाणे बाजारात विक्रीसाठी येण्यापूर्वी शासनाने ते प्रमाणित केलेले असते. उत्पादक कंपन्यांकडून ते पॅकींग केले जाते. तेच बियाणे शेतकऱ्यांना आहे तसे विक्री केले जाते. मात्र, त्यामध्ये दोष आढळल्यास त्यासाठी कृषी केंद्र संचालकांनाच दोषी धरले जाते. त्यातून केंद्र संचालकांवर अन्याय होतो. तो थांबवण्यासाठी राज्यभरात कृषी व्यावसायिक संघटनेने तीन दिवस बंद पाळून शासनाचे लक्ष वेधले आहे. त्यामध्ये बुलडाणा जिल्हा कृषी साहित्य विक्रेता आणि उत्पादक असोसिएशनने शंभर टक्के सहभाग नोंदवला आहे.शासनाने परवाने दिलेल्या बियाणे कंपनीकडूनच कृषी केंद्र संचालक खरेदी करतात. त्याची विक्री शेतकऱ्यांना करतात. त्यामध्ये दोष आढळल्याच्या तक्रारी येताच कृषी केंद्र संचालकांनाच दोषी धरले जाते. यासह विविध प्रकारच्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र राज्य कृषी व्यावसायिक संघटनेने १० ते १२ जुलै या दरम्यान राज्यभरात बंद पाळला आहे. या बंदला बुलडाणा जिल्ह्यातील विक्रेत्यांनीही पाठिंबा देत त्यामध्ये सहभाग घेतला आहे. त्या बंदला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कृषी सेवा केंद्राची वर्षभरात चार विभागाचे अधिकारी तपासणी करतात. त्यामुळे कृषी निविष्ठा विक्री करण्यास केवळ कृषी केंद्र संचालकांनाच जबाबदार धरता येणार नाही. परवाने नुतनीकरण, वारस, नवीन परवाने देण्याची प्रक्रीया सुटसुटीत करावी, संगणकीय पद्धतीने नोंद ठेवण्यास परवानगी द्यावी, मुदतबाह्य औषधे, किटकनाशके परत घेण्यास संबंधित कंपन्यांना आदेश द्यावे, तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्याची नुकसानभरपाई द्यावी, सध्या सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्या बियाण्यांमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. कृषी विभागाकडे तक्रारींचा ढिग लागत आहेत. त्यामुळे बियाणे विक्रेत्यांवरच गुन्हे दाखल करण्याचा प्रकार सुरू आहे. हा प्रकार बंद करण्यासोबतच इतरही मागण्यांची गांभिर्याने दखल न घेतल्यास दुकाने बंदच ठेवण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. त्या बंदमध्ये खामगावसह जिल्ह्यातील १००० पेक्षाही अधिक कृषी सेवा केंद्र संचालकांनी सहभाग घेतला आहे.

कोणत्याही प्रकरणात कृषी केंद्र संचालकांनाच आरोपी ठरवण्याची पद्धतच रूढ होत आहे. विविध अन्यायकारक बाबींविरोधात हा बंद पाळण्यात आला. शासनाने त्यावर गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.- श्रीकिशन पुरवार,सचिव, बुलडाणा जिल्हा कृषी साहित्य विक्रेता आणि उत्पादक असोशिएशन.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव