शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा अधिक रेस्टॉरंट बंद पडण्याच्या मार्गावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 11:17 IST

कोरोनाच्या भितीने ग्राहकांनी रेस्टॉरंटकडे पाठ फिरविल्याने अर्ध्यापेक्षा अधिक रेस्टॉरंट बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील सर्व हॉटेल बंद ठेवण्यात आले होते. आता शिथिलता मिळाल्यापासून रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहे. मात्र कोरोनाच्या भितीने ग्राहकांनी रेस्टॉरंटकडे पाठ फिरविल्याने अर्ध्यापेक्षा अधिक रेस्टॉरंट बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सध्या केवळ पार्सल सेवा सुरू असून, त्यातही ६० टक्क्याने विक्री घटली आहे.कोरोनामुळे चार महिन्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंट सुरू ठेवण्यास मुभा मिळालेली आहे. परंतू केवळ पार्सल सेवाच देण्याचे बंधन आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे रेस्टॉरंट व्यावसायीकांच्या लाखोंच्या उलाढालीवर परिणाम झाला आहे. रेस्टॉरंट सुरू झाल्यानंतरही ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र जिल्ह्यातील रेस्टॉरंटमध्ये दिसून येते. सण, उत्सवाच्या काळातही बाहेरचे मिठाई व इतर पदार्थ खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत नाही.

पूर्वी १५ हजार रुपये गल्ला आता एक हजार रुपये मिळणेही झाले कठीणअर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी शासनाने छोट्या-मोठ्या व्यवसायांना परवानगी दिली. त्यात रेस्टॉरंट आणि मिठाईविक्रीच्या दुकानांचाही समावेश आहे. मात्र करोना संसर्गाच्या भीतीमुळे अनेक पालक मुलांना बाहेरचे पदार्थ खाऊ देत नसल्याने त्याचा फटका रेस्टॉरंट व्यवसायाला बसल्याची खंत काही व्यावसायीकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. पूर्वी दिवसाला १५ ते २० हजार रुपये गल्ला येणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये आता केवळ ७०० ते ८०० रुपये येत असल्याची माहिती एका व्यावसायिकाने दिली.

७० लिटर चहाच्या ठिकाणी आता सहा लिटर चहाची विक्रीकोरोना येण्यापूर्वी बुलडाण्यातील एका रेस्टॉरंटमध्ये दिवसाला ७० लिटर चहाची विक्री होत होती. त्याच ठिकाणी सध्या केवळ सहा लिटर चहाची विक्री दिवसाकाठी होत आहे. रेस्टॉरंटमध्ये बसून चहा पिण्यास मनाई असल्याने, ही चहा विक्री कामगार बाहेर फिरून करत आहेत. परंतू त्यालाही प्रतिसाद मिळत नाही.

सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात मिठाईची विक्री होते; मात्र आता कोरोनाच्या भीतीने मिठाई विक्री होत नाही. उन्हाळ्यात विक्री केल्या जाणारा मालही मुदत संपल्या कारणाने फेकुन दिला. सध्या केवळ पार्सल सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तरीसुद्धा ६० टक्के विक्री कमी झालेली आहे. शासनाने अटी शिथील करणे आवश्यक आहे.- भारत शेळके, रेस्टॉरंट मालक, बुलडाणा.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक