शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात निम्या योजना बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:12 IST

नांदुरा: तालुक्यातील ६५ पैकी बहुतांश ग्रामपंचायतींची पाणीपट्टी  वसुली थकीत असून, पाणीपुरवठा योजनांचे २ कोटींच्या वर  वीज बिल रखडले आहे. परिणामी, तालुक्यातील निम्या पाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा वीज वितरणने खंडित केला  असल्याने  ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण फिरावे लागत  आहे.

ठळक मुद्देथकीत वीज बिलापोटी महावितरणची कारवाईपूर्वतयारी प्रशिक्षणाचे आयोजन

संदीप गावंडे। लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा: तालुक्यातील ६५ पैकी बहुतांश ग्रामपंचायतींची पाणीपट्टी  वसुली थकीत असून, पाणीपुरवठा योजनांचे २ कोटींच्या वर  वीज बिल रखडले आहे. परिणामी, तालुक्यातील निम्या पाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा वीज वितरणने खंडित केला  असल्याने  ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण फिरावे लागत  आहे.गावामधील पाणीपट्टी वसुली करून त्यामधून पाणीपुरवठा  योजनेच्या वीज बिलाचा भरणा करण्यात येतो; परंतु ग्रा.पं. स् तरावर वसुली करण्याकडे शासन व प्रशासन अकार्यक्षम  असल्याचे तालुक्यातील मोठय़ा प्रमाणात थकीत पाणीपट्टी, घर पट्टी व इतर करांवरून दिसून येते. काही ग्रामपंचायतींनी तीन ते  चार वर्षांपासून वीज बिल भरलेच नसल्याने त्यांच्याकडे  थकबाकी वाढली आहे. आता वीज वितरणने घेतलेल्या  भूमिकेमुळे या ग्रामपंचायती वीज बिल भरण्यास असर्मथ आहेत.  हे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे चार ते पाच वर्षांपासून पाणी पुरवठा कर वसुली झाली असूनही वसुलीच्या प्रमाणात वीज  बिल भरले नसल्यानेच आज ग्रा.पं.वर वीजपुरवठा खंडित  करण्याची वेळ आली आहे. आता काही ग्रामपंचायतींमध्ये तर  वीज बिल जास्त व त्याहीपेक्षा कमी पाणीपट्टी थकीत आहे.  त्यामुळे आतापर्यंत वसूल झालेली कराची रक्कम कोठे खर्च  झाली, हे अद्याप कोडेच  आहे.