शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पैसे आणि दादागिरीने सत्ता मिळत नाही : तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 14:37 IST

सर्वसामान्यांनी राष्टÑवादी काँग्रेस आघाडीचे उमदेवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना पाठबळ देऊन या संधीचे सोने करावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले.

बुलडाणा : केवळ पैसे किंवा दादागिरीने सत्ता मिळवता येत नाही. असे असते तर या देशात करोडपती उद्योजकांचे किंवा माफीयांचेच राज्य असते. कोणी केवळ पैसे किंवा दादागिरीने सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांना सर्वसामान्यांनी लोकशाहीची ताकद दाखविली पाहिजे. या निवडणुकीच्या निमित्ताने आता बुलडाण्यात परिवर्तनाची संधी चालून आली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांनी राष्टÑवादी काँग्रेस आघाडीचे उमदेवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना पाठबळ देऊन या संधीचे सोने करावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले.राष्टÑवादी काँग्रेस आघाडीतील नेत्यांनी ३० मार्च रोजी मेहकर तालुक्यात प्रचार दौरा केला. यावेळी जानेफळ येथे सभा पार पडली. यासभेत तुपकर बोलत होते. मंचावर उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, लक्ष्मण घुमरे, नगराध्यक्ष कासम गवळी, साहेबराव सरदार, युनायटेड रिपिब्लकन पार्टीचे नितीन मोरे, अनंतकुमार वानखेडे, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष देवानंद पवार, राष्ट्रवादीचे संतोष चांदणे यांच्यासह आघाडीतील मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.तुपकर म्हणाले की, भाजपा सरकारने दीडपट हमीभाव आणि कर्जमुक्तीचा शब्द दिला होता; परंतू त्यांनी तो शब्द पाळला नाही, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाही. याउलट आघाडीने शेतकरी हिताचे निर्णय घेण्याबाब आश्वासन दिल्याने स्वाभिमानी आघाडी सोबत आहे. डॉ.शिंगणेंनी स्वत: कोणतीही संस्था, शाळा न घेता कार्यकर्त्यांना दिल्या. कार्यकर्त्यांना मोठे करण्याचे काम त्यांनी केले तर त्यांच्या विरोधातील उमेदवाराने मात्र सगळ्या संस्थांची पदे आपल्याच घरात ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. एवढेच नव्हे तर स्व.दिलीपराव रहाटे यांच्यासह स्व.किशोरबापू देशमुख, स्व.बंडू पाटील मापारी, स्व.दामूअण लोढे या जुन्या शिवसैनिकांच्या भरवश्यावर नेते झाले आणि आता त्यांच्या कुटुंबियांना वाºयावर सोडले. या शिवसैनिकांच्या वारसांना त्यांनी काय दिले, असा प्रश्न तुपकरांनी भाषणात उपस्थित केला.यावेळी डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आरोग्य मंत्री असताना जिल्ह्यातील दवाखाने सुसज्ज करण्याचे कामे. आरोग्यविषयक विविध सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या.खडकपूर्णा प्रकल्प मार्गी लावले असा दावा करीत खासदारांनी दहा वर्षांत कोणते मोठे काम केले ते सांगावे असे आव्हान प्रतापराव जाधव यांना दिले. सभेत श्याम उमाळकर, नितीन मोरे, कासम गवळी, लक्ष्मण घुमरे, अनंता वानखेडे यांचीही भाषणे झाली. यावेळी शिवसेनेकडून तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या गंगुबाई पाटील यांचे पती किसन पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRavikant Tupkarरविकांत तुपकरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbuldhana-pcबुलढाणा