शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

युवतीची छेडखानी; खामगावात दोन गट भिडले, तुफान दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 22:06 IST

दोन गटात दगडफेक झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : पाणी  भरण्यास गेलेल्या युवतीची काही युवकांनी टॉन्टींग करीत छेड काढल्यावरून खामगावतील सजनपुरी भागात दोन गटात झालेल्या वादाचे पर्यवसन तुफान दगडफेकीत झाले. सायंकाळी ६.३० वाजताचे सुमारास झालेल्या या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. सजनपुरीतील एक युवती सायंकाळी हातपंपावर पाणी भरण्यासाठी गेली असता, हातपंपाजवळ  उभ्या असलेल्या काही युवकांनी तिला ‘टॉन्टींग’ केली. तसेच अर्वाच्च भाषेत शिविगाळ करून छेडखानी केली. हातपंपावर घडलेला हा प्रकार युवतीने आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना सांगितला. तिच्या परिवारातील मंडळींनी शेजारी आणि आपल्या समाजाच्या लोकांना ही हकीकत सांगताच जमाव संतप्त झाला. दोन्ही गट समोरा-समोर धडकले. काही क्षणातच तुफान दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीत दोन जण जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.  त्यांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांनतर जखमींना खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. घटनास्थळी अप्पर पोलिस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनिल अंबुलकर, शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनिल हुड, ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरिक्षक रफिक शेख यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. (प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी