शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक, युवतीकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By सदानंद सिरसाट | Updated: June 1, 2024 15:44 IST

समाजमाध्यमावर पीडितेचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल

सदानंद सिरसाट, संग्रामपूर (बुलढाणा) : अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. संग्रामपूर तालुक्यातील एका २४ वर्षीय युवतीने गावातीलच १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना १८ मे ते २८ मे दरम्यान घडली. याप्रकरणी तामगाव पोलिस ठाण्यात ३० मे रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना २४ वर्षीय युवती तिच्या घरात गेली. घराचा दरवाजा बंद करून पीडित मुलीला कपडे काढायला सांगितले. मात्र, अल्पवयीन मुलीने कपडे काढण्यास नकार दिला. त्यावेळी आरोपी युवतीने जिवे मारण्याची धमकी देत पीडितेला अर्धनग्न केले. तसेच भ्रमणध्वनीमध्ये पीडितेचे फोटो काढले. त्यानंतर आरोपी युवतीने अल्पवयीन मुलीसोबत नको ते चाळे करायला सुरुवात केली. पीडितेने आरडाओरड करताच आरोपी युवतीने घरातून पळ काढला. आरोपी युवती इथेच थांबली नाही. तिने इंस्टाग्राम या समाज माध्यमावर बनावट नावाने अकाऊंट तयार करून अल्पवयीन मुलीचे फोटो अपलोड केले.

युवतीने अल्पवयीन मुलीची छेड काढत तिच्याशी पुरुषी लगट करत विनयभंग केल्याची ही पहिलीच घटना संग्रामपूर तालुक्यात उघडकीस आली. दरम्यान, अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून तामगाव पोलिस ठाण्यात आरोपी २४ वर्षीय युवतीवर कलम ४५२, ३५४, ३५४ (अ), ३५४ (ब), ३४२, ५०६, भादंविसह आर डब्ल्यू ८, १२, १४ पोक्सो, आरडब्ल्यू ६७ माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मलकापूर यांच्या आदेशाने जळगाव जामोदचे पोलिस निरीक्षक आनंद महाजन यांच्याकडे देण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी