बुलडाणा : चिखली शहरासह परिसरातील भाविक भक्तांचे शक्तिपीठ म्हणून आदिशक्ती रेणुका मातेची ओळख आहे. शहरातील मध्यभागी असलेल्या मातेच्या मंदिराचा उंच कळस आठ ते दहा मैलावरून डौलाने ताठ दिमाखात उभा असलेला दिसतो. रेणुका मातेचे मंदिर म्हणजे कुलदेवता प्रसन्न करणार्या तपस्वींची तपोभूमी, ऋषीमुनींची यज्ञभूमी देवतांच्या उपासनेची शक्तीभूमी होय. निजामशाहीच्या कालखंडात मंदिरावरील हल्ल्याची कल्पना गावकर्यांना येताच गावातील वतनदार मंडळींनी शस्त्र हाती घेऊन देवीच्या मंदिराचे संरक्षण केले. देवीची पूजाअर्चा करण्यासाठी तपस्वी बचानंद महाराज यांची नेमणूक करण्यात आली. त्यांच्यानंतर त्यांच्या शिष्यांनी मंदिराचे काम पाहिले. कालांतराने मंदिराच्या व्यवस्थापनाने विश्वस्त मंडळाची नेमणूक करण्यात आली. या संस्थानमध्ये दरवर्षी तीन उत्सव साजरे करण्यात येतात.
चिखलीची रेणुकामाता
By admin | Updated: September 26, 2014 00:09 IST