शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

‘मॉडेल स्टेशन’चा दर्जा कागदावरच

By admin | Updated: May 25, 2015 02:32 IST

मलकापूर रेल्वे स्थानकात सुविधांचा अभाव; निधीअभावी रखडला आराखडा.

मनोज पाटील / मलकापूर : विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर रेल्वे स्थानकावरुन घाटावरील प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. या स्टेशनवर जवळपास २९ गाड्यांचे थांबे असून येथे मॉडेल स्टेशनचा दर्जा प्राप्त झालेला आहे. असे असलेतरी या स्थानकावर आजही प्रवाशांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधांचा अभाव असून या स्थानकाचा केवळ निधी अभावी अभिप्रेत असा विकास रखडलेला आहे. सन २00४ मध्ये जिल्ह्याचे तत्कालीन खासदार आनंदराव अडसूळ व मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती यांचे संयुक्त प्रयत्नातून मलकापूर रेल्वे स्थानकास मॉडेल स्टेशनचा दर्जा मिळावा हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे दाखल करण्यात आला होता. तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री नितेशकुमार यांनी सदर प्रस्ताव मंजूर केला. मात्र नंतरच्या काळात केंद्रात सत्ता पालट झाल्याने या मॉडेल स्टेशनचा प्रस्ताव थंडबस्त्यात पडला. याप्रकरणी आ.संचेती व जिल्हा प्रवासी संघाने केंद्र शासन तसेच रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवल्याने या प्रस्तावास पुन्हा नव्याने २३ जुलै २0१२ रोजी मंजुरात मिळाली. आजमितीस या रेल्वे स्थानकाला मॉडेल स्टेशनचा दर्जा मिळून ३ वर्षाचा कालावधी लोटला असलातरी या स्थानकाला अद्यापही मॉडेल स्टेशनचे स्वरुप प्राप्त झाले नाही. जिल्हा प्रवासी सेवा संघ व लोकप्रतिनिधींच्या पुढाकारातून या स्थानकावर अनेक रेल्वे गाड्यांचे थांबे व प्रवाशांकरिता सोयी उपलब्ध झाल्यात. पिण्याचे पाणी, शौचालये, बाथरुम आदी सुविधा या स्थानकावर असूनही या सुविधांचा दर्जा मात्र खालावलेला आहे. रेल्वे स्थानकाबाहेर बेशिस्तीत असलेल्या ऑटोचालकांचा प्रवाशांना होणारा त्रास पाहता स्थानकासमोरील शासनाची मोकळी जागा रेल्वे प्रशासनाने शासनाकडे मागितली होती. राज्य शासनानेही या मागणीस ७ ते ८ वर्षाआधीच हिरवी झेंडी दिली. अशाप्रकारे या मॉडेल रेल्वेस्थानकाचे कवित्व सुरु असून हे कवित्व केवळ निधी अभावीच होत आहे. या बाबीकडे केंद्र शासन व रेल्वे प्रशासनाने तात्काळ लक्ष दिले तरच या स्थानकाला खर्‍याअर्थी मॉडेल स्टेशनचे स्वरुप प्राप्त होवू शकते. यासाठी आता पाठपुरावा हवा आहे.