शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान आवास योजनेत गतिमानता; खामगावात धावपळ: जिल्ह्यातील सहा पालिकाही लागल्या कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 17:28 IST

खामगाव: आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचे घरकुलांचे स्वप्नं साकार करण्यासाठी जिल्ह्यातील पालिका प्रशासन कामाला लागले असून,   पंतप्रधान आवास योजनेत गेल्या काही दिवसांपासून गतिमानता आल्याचे  चित्र आहे. यामध्ये खामगाव शहरात घरकुलासाठी साडेसहा हजार अजार्चे वितरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसर्वांसाठी घरे हे ब्रिद असलेल्या पंतप्रधान आवास योजनेचा शुभारंभ २५ जून २०१५ रोजी करण्यात आला. यामध्ये खामगाव शहरात घरकुलासाठी साडेसहा हजार अजार्चे वितरण करण्यात आले आहे. खामगाव पालिकेसह बुलडाणा, चिखली, मलकापूर, शेगाव, देऊळगाव राजा आणि लोणार या नगर पालिकांमध्ये चढाओढ सुरू असल्याचे दिसून येते.

- अनिल गवईखामगाव: आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचे घरकुलांचे स्वप्नं साकार करण्यासाठी जिल्ह्यातील पालिका प्रशासन कामाला लागले असून,   पंतप्रधान आवास योजनेत गेल्या काही दिवसांपासून गतिमानता आल्याचे  चित्र आहे. यामध्ये खामगाव शहरात घरकुलासाठी साडेसहा हजार अजार्चे वितरण करण्यात आले आहे.सर्वांसाठी घरे हे ब्रिद असलेल्या पंतप्रधान आवास योजनेचा शुभारंभ २५ जून २०१५ रोजी करण्यात आला. आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या लाभार्थ्यांसाठी चार भागांची वेगळी योजना असे या योजनेचे खास वैशिष्टे आहे. यामध्ये जिल्ह्यातील खामगाव- ३५१९, बुलडाणा- २७८३,  मलकापूर- २६७१ आणि चिखली-२३४१ या चार शहरांमधील ११ हजार ३४० घरकुलांचा समावेश असून, उर्वरीत मेहकर, नांदुरा, शेगाव, जळगाव जामोद, देऊळगाव राजा,  सिंदखेड राजा, लोणार, मोताळा आणि संग्रामपूर या नऊ पालिका आणि पंचायतींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ९ हजार ६५६ घरकुलांचे उद्दीष्ट २०१७- २०२२ या कालावधीसाठी निधार्रीत करण्यात आले आहे. दरम्यान, खामगाव पालिकेने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेची नेमणूक केली असून,  मंगळवारी सायंकाळपर्यंत शहराच्या विविध भागात सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. यामध्ये तब्बल साडेसहा हजार अजार्चे वितरण करण्यात आले. तसेच ७० सर्वेक्षकांच्या माध्यमातून जवळपास तीन हजाराच्यावर अर्ज भरून घेण्यात आले आहेत.

खामगावात साडेसहा हजार अजार्चे वितरण!पंतप्रधान आवास योजनेला खामगाव शहरात कमालिची गती प्राप्त झाली असून,  या योजनेच्या सर्वेक्षणास प्रारंभ करण्यात आल्यानंतर ६५ ते ७० सर्वेक्षकांद्वारे पंधरा-वीस दिवसांमध्ये तब्बल साडेसहा हजार अर्जांचे वितरण करण्यात आले आहे. परिणामी, उद्दीष्टापेक्षा घरकुल लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसते. दरम्यान, २४ जानेवारीपर्यंत खामगाव पालिकेत तीन हजार नागरिकांनी अर्ज भरून दिल्याची माहिती आहे. 

बुलडाण्यासह सहा पालिकांचा समावेश!पंतप्रधान आवास योजनेचे निर्धारित उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी खामगाव पालिकेसह बुलडाणा, चिखली, मलकापूर, शेगाव, देऊळगाव राजा आणि लोणार या नगर पालिकांमध्ये चढाओढ सुरू असल्याचे दिसून येते. स्वच्छ महाराष्ट्र अभियानात शेगाव पालिकेची कामगिरी सरस असल्याने, पंतप्रधान आवास योजनेच्या उद्दीष्टपूतीर्साठी या पालिकेची धावपळ सुरू असल्याचे दिसून येते. 

खामगावात सर्वाधिक घरकुल!जिल्ह्यातील १३ तालुक्यांच्या तुलनेत खामगाव शहरात सर्वाधिक ३५१९ घरकुलांचे उद्दीष्ट असून, बुलडाणा शहरात २७८३ घरकुलांचे तर २६७१ घरकुलांसह मलकापूर तालुका  घरकुलांच्या उद्दीष्टांमध्ये तिसºयास्थानी असल्याचे दिसून येते.

टॅग्स :khamgaonखामगावgovernment schemeसरकारी योजना