शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मतदान कक्षात मोबाईल बंदी; सेल्फी बहाद्दरांवर होणार कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 16:09 IST

आपले मतदान हे गुप्त मतदान असल्याने त्याचा भंग होऊ नये असा नियम आहे.

डोणगाव : मतदान कक्षात सेल्फी काढणाऱ्या सेल्फी बहाद्दरांवर आता निवडणूक विभागाकडून कार्यवाही होऊ शकते. मतदान कक्षात मोबाईल नेण्यास बंदी आहे. त्यामुळे सेल्फी बहाद्दरांनी काळजी घेण्याची गरज आहे.मतदान प्रक्रियेमध्ये प्रत्येक मतदाराला निर्भयपणे मतदान करता यावे याकरिता निवडणूक विभागाने तयारी केली आहे. आपले मतदान हे गुप्त मतदान असल्याने त्याचा भंग होऊ नये असा नियम आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत काही हौशी कार्यकर्त्यांनी आपले मतदान कुणाला हे दाखवण्यासाठी थेट मतदान कक्षात मतदान करतांना फोटो, सेल्फी व व्हिडिओ काढले होते. निवडणूक आयोगाने कठोर पावले उचलत मतदान कक्षात मोबाईल व कॅमेरा या सारखे साधने वापरण्यास सक्त मनाई केली आहे. त्यामुळे मतदान कक्षात फोटो किंवा व्हिडिओ काढल्यास कार्यवाही होणार आहे.निवडणूक विभागाने मतदारांची गुप्तता भंग होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली. मतदान यंत्रावर मतदान करते वेळी मतदार काय करीत आहे हे दिसायला नको म्हणून आडोसा लावलेला असतो. मात्र नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन काही हौशी विविध फंडे वापरतात. आपल्या उमेदवाराशी एकनिष्ठता दाखवण्यासाठी मागच्या लोकसभा निवडणुकीत बटन दाबतांना सेल्फी, व्हिडिओ, फोटो सोशल मीडिया टाकल्या गेले. त्यामुळे गुप्तता भंग झाली. यावर निवडणूक विभागाने विधानसभा निवडणूकीमध्ये मतदाराला वोटर स्लिप पाठविली. त्यात स्पष्टपणे लिहिलेले आहे की, मतदान कक्षात मोबाईल किंवा कॅमेरा असलेले उपकरण वापरता येणार नाहीत. मतदान कक्षात मतदान करतांना उमेदवार, नेते, व्हीआयपी हे आपले फोटो काढून सोशल मीडियावर टाकतात. आता त्यांना सुद्धा मतदान कक्षात फोटो काढायला जमणार नाहीत. मतदारांनी मतदान कक्षात जातांना निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. आपल्याकडून नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. निवडणूक आयोगाकडून वेळोेवेळी सूचना देण्यात येतात. त्याकडे गांभिर्याने लक्ष देऊन सूचनांचे तंतोतंत पालन करण्याची गरज आहे. विधानसभा निवडणूकीसाठी २१ आॅक्टोंबर रोजी मतदान होत आहे. तर २४ आॅक्टोंबरला मतमोजणी होणार आहे. मतदान कक्षात कॅमेरा, मोबाईल, चित्रिकरण करणारे उपकरण वापरू नये. असे करतांना आढळल्यास मोबाईल किंवा उपकरण जप्त करण्यात येईल. संबंधितांवर गुन्हा सुध्दा दाखल करण्यात येऊ शकतो.- गणेश राठोडनिवडणूक निर्णय अधिकारी, मेहकर

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019