शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नवतंत्रज्ञानाच्या युगात बळीराजाच्या सोबतीला ‘मोबाइल अँप’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 22:51 IST

शेतकर्‍यांना मार्गदर्शन देण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाने शेती संबंधित १८ मोबाइल अँप तयार केलेले आहेत. मोबाइल अँपच्या माध्यमातून शेतकर्‍यांना वेळोवेळी कृषी सल्ला दिल्या जात असल्याने कृषी विभागाचे मोबाइल अँप बळीराजाचा सोबती ठरत आहे. 

ठळक मुद्देअँपद्वारे शेतकर्‍यांना कृषी सल्ला शेती संबंधित कृषी विभागाचे १८ मोबाइल अँप 

ब्रह्मनंद जाधव। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : नवतंत्रज्ञानाच्या युगात शेतीत होणारे वेगवेगळे बदल व उत्पन्न  वाढीसाठी शेतकर्‍यांना वेळोवेळी मार्गदर्शन देण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाने शेती संबंधित १८ मोबाइल अँप तयार केलेले आहेत. मोबाइल अँपच्या माध्यमातून   शेतकर्‍यांना वेळोवेळी कृषी सल्ला दिल्या जात असल्याने कृषी विभागाचे विविध  मोबाइल अँप शेतात राबणार्‍या बळीराजाचा सोबती ठरत आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात झालेल्या बदलाचा स्वीकार शेतकर्‍यांनी केला असून,  शेतीसाठी विविध यांत्रिक उपकरणांचा वापरही शेतकरी करीत आहेत; परंतु हवामाना तील अचानक होणारे बदल, पिकांवर पडणार्‍या कीड व रोगांवरील उपाययोजना,  िपकांच्या विविध जाती, पीक विमा योजना बाजार भाव यांसारख्या विविध माहितीचा  अभाव शेतकर्‍यांना असतो. तसेच उत्पादनवाढीसाठी शेतकर्‍यांना वेळोवेळी  मार्गदर्शनाची गरज असते; या दृष्टीने  महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने शेती  संबंधित १८ मोबाइल अँप तयार केले आहेत.ग्रामीण भागात वाढती मोबाइल सेवा तसेच स्मार्ट फोनचा वाढता वापर व मोबाइल  कंपन्याद्वारे उपलब्ध इंटरनेट सुविधा यामुळे मोबाइल अँपच्या माध्यमातून माहिती  मिळविण्यासाठी  कृषी विभागाने टाकलेले हे पाऊल शेतकर्‍यांसाठी महत्त्वाचे ठरत  आहे. शेतकर्‍यांकडून शेती संबंधित माहिती मिळविण्यासाठी मोबाइल अँपचा वापर  वाढला असून, सद्यस्थितीत विकसित अशा मोबाइल अँपद्वारे युवा शेतकरी कृषी  विभागाचा सल्ला घेऊन शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. शेतीमध्ये सर्वाधिक फटका बसतो तो हवामानातील अचानक होणार्‍या बदलांचा.  त्यावर मात करण्यासाठीही मोबाइल अँप शेतकर्‍यांसाठी फायद्याचे ठरत आहे. शे तकर्‍यांना हवामान आणि त्यावर आधारीत कृषी, फळबाग आणि पशुपालन सल्ला  मोबाईल अँपद्वारे मिळत आहे. कृषी विभागाच्या मोबाईल अँपमुळे शेतकर्‍यांना पिकांचे नियोजन करण्यास आणि  पीक वाचविण्यास सोईचे होत आहे. 

हे आहेत कृषी विभागाचे अँपशेती संबंधित माहिती देण्यासाठी कृषी विभागाने वेगवेगळे मोबाईल अँप तयार केले  आहेत. त्यामध्ये महारेन, क्रॉप क्लिनिक, कृषि मित्र, एम.किसान भारत, किसान  सुविधा, पुसा कृषि, क्रॉप इनशुरन्स, डिजीटल मंडी भारत, अँग्री मार्केट, पशु पोषण,  कॉटन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, हळद लागवड, पीक पोषण, लिंबू वर्गीय  फळझाडांची लागवड, शेकरू, इफ्को किसान आदी मोबाईल अँपद्वारे शेतकरी  कृषी विभागाचा सल्ला घेत आहेत. 

अँपद्वारे मिळते ही माहितीकृषी विभागाच्या मोबाईल अँपद्वारे मंडळ, तालुका जिल्हा विभाग स्तरावरील  आजचा व सर्वसाधारण पाऊस, सोयाबीन, कापूस भात तूर व हरभरा या पाच  िपकांच्या किडी व रोगावर उपाययोजना, तालुक्यातील खत-बियाणे औषधी विक्रे त्यांची माहिती, कृषी हवामान विषयक शेतीसाठी उपयुक्त सल्ले, हवामान, कृषी  निविष्ठा व्यापारी, बाजारभाव पीक संरक्षण, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, शे तमालाचे दर, जनावराचे आहार विषयक मार्गदर्शन, कापूस लागवड तंत्रज्ञान,  फळझाडांच्या लागवडीबाबत माहिती, विविध कृषी योजना व प्रशिक्षण यासह अनेक  विषयांवर माहिती मिळत आहे. 

शेती संबंधित कृषी विभागाच्या वेगवेगळ्या मोबाईल अँपचा शेती करताना चांगला  उपयोग होत आहे. शेतीत होणारे बदल व नवतंत्रज्ञानाची ओळख अँपद्वारे  झाली  असून, नेटशेडसाठी व विविध प्रकारची माहिती कृषी विभागाच्या मोबाईल अँपद्वारे  घेऊन त्याचा शेतीसाठी पुरेपुर वापर करतो. - नितीन भिकनराव देशमुख, युवा शेतकरी, ऊमरा दे. ता.मेहकर.-

टॅग्स :Mobileमोबाइलagricultureशेतीbuldhana residenceबुलडाणा रेसीडन्सी