शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

चार वर्षातील कामांवरून ठरणार नववर्षातील मनरेगाचे ‘लेबर बजेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 17:40 IST

बुलडाणा: रोजगार हमी योजनेंतर्गत नविन वर्षाच्या ‘लेबर बजेट’मध्ये मागणी व कामांचा मेळ साधण्याचे नियोजन सध्या प्रशासकीय पातळीवरून सुरू आहे.

- ब्रम्हानंद जाधव 

बुलडाणा: रोजगार हमी योजनेंतर्गत नविन वर्षाच्या ‘लेबर बजेट’मध्ये मागणी व कामांचा मेळ साधण्याचे नियोजन सध्या प्रशासकीय पातळीवरून सुरू आहे. यामध्ये चार वर्षात ज्या वर्षी सर्वात जास्त मंजुरांना रोजगार उपलब्ध झाला (मनुष्य दिवस निर्मिती) त्या दिवसाच्या संख्येनुसार लेबर बजेटचे नियोजन ठरणार आहे. जिल्हाकार्यक्रम समन्वयकांना जिल्हा वार्षिक आराखडा व लेबर बजेट ३१ जानेवारीपर्यंत मनरेगा आयुक्तालयांकडे सादर करावे लागणार आहे. राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे अनेकांच्या हाताला सध्या काम नाही. त्यामुळे वाढती बेरोजगारांची संख्या पाहता सध्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरूनही कामांच्या उपलब्धतेकडे लक्ष दिल्या जात आहे. मजूरांची संख्या व कामे यांची सांगड घालुन नववर्षासाठी मनरेगाचे लेबर बजेट तयार करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीतील लोकांच्या कामाच्या मागणीच्या आधारे २०१९-२० या आर्थिक वर्षाचे लेबर बजेट तयार करण्यात येत असून यामध्ये अपेक्षीत मागणीचा कालावधी ग्रामपंचायत अंतर्गत विविध कामांवर मनुष्य दिवसांची निर्मिती याचा विचार करण्यात येतो. ग्रामपंचायतीमध्ये गत चार वर्षात ज्या वर्षी सर्वात जास्त मनुष्य दिवस निर्मिती झालेली आहे, त्या मनुष्य दिवसाच्या संख्येनुसार लेबर बजेटचे नियोजन बहुतांश ग्रामपंचायतीकडून तयार करण्यात आले आहे. त्यानंतर ग्रामपंचायतस्तरावरील लेबर बजेट निश्चितीनंतर वार्षिक कृती आराखड्यामध्ये समाविष्ट करण्याच्या विविध कामांच्या नियोजन प्रक्रियेला प्रारंभ आणि ग्रामसभा किंवा प्रभागसभेद्वारे नियोजन प्रक्रिया आॅगस्ट ते सप्टेंबर मध्ये राबविण्यात आली होती. तर मागील महिन्यात या कामांना ग्रामपंचायतस्तरावर मंजूरी देण्यात आली. प्रशासकीय पातळीवरून सध्या या कामांच्या नियोजनाकडे लक्ष दिल्या जात असल्याचे चित्र आहे. 

प्रवास लेबर बजेटचाग्रामपंचायतमध्ये तयार झालेले मनरेगाच्या कामांचे नियोजन ५ डिसेंबरपर्यंत पंचायसमितीकडे सादर करणे आवश्यक होते. त्यानंतर आता पंचायतसमितीद्वारे तालुका स्तरावरील एकत्रित वार्षिक नियोजन आराखड्यास मंजुरी देणे व तो जिल्हा कार्यक्रम समन्वयकांकडे २० डिसेंबरपर्यंत सादर करावा लागणार आहे. त्यानंतर जिल्हा कार्यक्रम समन्वयक जिल्हा परिषदेद्वारे जिल्हा स्तरासाठी प्रस्तावित केलेल्या कामांचा समावेश करून लेबर बजेटला मंजूरी घेतील. ३१ जानेवारीपर्यंत संपुर्ण जिल्ह्याचे लेबर बजेट मनरेगा आयुक्तालयांकडे सादर करावे लागणार आहे. 

रोहयो यंत्रणेला केले सतर्करोजगार हमी योजनेचे सचिव एकनाथ डवले यांनी शनिवारी बुलडाणा येथे रोहयोच्या कामांचा आढावा घेऊन रोहयोच्या यंत्रणेला कामे उपलब्ध करण्यासाठी सतर्क केले. दुष्काळी परिस्थिती पाहता, प्रत्येकाच्या हाताला काम मिळाले पाहिजे, त्यासाठी पुर्वनियोजन करण्याच्या स्पष्ट निर्देश एकनाथ डवले यांने रोहयोच्या प्रशासनाला दिले. डवले यांच्या या बैठकीने जिल्ह्यात कामाचे योग्य नियोजन होऊन सर्वांना रोजगार उपलब्ध होण्याचे संकेत निर्माण झाले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना