शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

मुलीचा विनयभंग करणार्‍या मुख्याध्यापकास चोपले! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:01 IST

नांदुरा : मुसळधार पाऊस सुरू असल्याने आपल्या लहान  भावास आणावयास गेलेल्या मुलीचा मुख्याध्यापकाने विनयभंग  केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी वडगाव डिघी येथील  जिल्हा परिषद शाळेत साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. या  घटनेनंतर बुधवारी दुपारी मुलीच्या संतप्त नातेवाइकांसह  गावकर्‍यांनी संबंधित मुख्याध्यापकाला चांगलाच चोप दिला.  

ठळक मुद्देलहान  भावास आणावयास गेलेल्या मुलीचा मुख्याध्यापकाने केला विनयभंग  वडगाव डिघी येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : मुसळधार पाऊस सुरू असल्याने आपल्या लहान  भावास आणावयास गेलेल्या मुलीचा मुख्याध्यापकाने विनयभंग  केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी वडगाव डिघी येथील  जिल्हा परिषद शाळेत साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. या  घटनेनंतर बुधवारी दुपारी मुलीच्या संतप्त नातेवाइकांसह  गावकर्‍यांनी संबंधित मुख्याध्यापकाला चांगलाच चोप दिला.  दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून  आरोपीस  अटक केली आहे.राजेश नामदेव ढोले रा. दाताळा, ह.मु. मलकापूर हा शिक्षक जुलै  २00९ रिसोड जि.वाशिम येथून जिल्हा बदलीवर बुलडाणा  जिल्ह्यातील नांदुरा पंचायत  समितीमध्ये रूजू झाला. तेव्हापासून  तो वडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर कार्यरत  असून, त्याच्याकडे मुख्याध्यापकाचाही प्रभार आहे. तालुक्यात  गेल्या चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. पीडितेचा लहान भाऊ  हा सदर शाळेत तिसर्‍या वर्गात शिकत असून, त्याचा हात फॅ्र क्चर आहे. आपल्या भावाच्या हाताचे प्लॅस्टर ओले होऊ नये  म्हणून १४ वर्षीय त्याची बहीण छत्री घेऊन संध्याकाळी शाळा  सुटण्याचे वेळी भावाला घेण्यासाठी गेली. सदर मुलीच्या भावाला  फळ्यावर लिहिलेले सदर शिक्षकाने वाचण्यास सांगितले व  त्याच्या पाठीमागे सदर मुलीचा विनयभंग केला. घडलेली  हकीकत मुलीने घरी जाताच घरातील मंडळींना सांगितली.  दरम्यान, शाळा सुटल्याने शिक्षक निघून गेला. दुसर्‍या दिवशी  सकाळी ११ वा. शाळेत सदर शिक्षक येताच मुलीच्या नातेवाईक  व गावकर्‍यांनी शिक्षकास जाब विचारला असता, असे काही  केलेच नसल्याचे तो सांगु लागला; परंतु गावकर्‍यांनी धुलाई कर ताच त्याने गैरकृत्य केल्याचे उघड झाले. दरम्यान, सदर प्रकार  काही गावकर्‍यांनी पोलिसांना कळवला असता, पोलिसांनी  जिल्हा परिषद शाळा गाठून सदर राजेश ढोले या शिक्षकास  ताब्यात घेतले व मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे  चौकशीकरिता नेले. सदर पीडित मुलीने त्या शिक्षकाविरुद्ध  मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे जावून फिर्याद दिली.त्यानुसार पोलिसांनी आरोपी शिक्षक राजेश ढोले  याच्याविरुद्ध  कलम ३५४, ५0६ अन्वये गुन्हा दाखल केला  आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक घुगे यांनी मलकापूर ग्रामीण  पोलीस स्टेशन येथे सदर आरोपीची चौकशी केली असून,  पोलीस निरीक्षक साळुंके यांचे मार्गदर्शनात पीएसआय सोनवणे  करीत आहेत.