खामगाव, दि. ११- शहरातील बाळापूर फैल भागातील २२ वर्षीय बेपत्ता युवकाचा पडीत विहिरीत मृतदेह आढळून आला. याप्रकरणी बुधवारी मृताच्या वडिलांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खत्री बंधूविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. कुंदन देवीदास शिंदे हा युवक ७ जानेवारीपासून घरून निघून गेला होता. नातेवाइकांनी त्याचा शोध घेतल्यानंतरही आढळून न आल्याने हरविल्याबाबत तक्रार दिली होती. दरम्यान, तीन दिवसांनंतर कुंदन शिंदे याचा मृतदेह अकोला मार्गावरील महाबीज मंडळाच्या पाठीमागील पडीत विहिरीत तरंगताना नागरिकांना दिसून आला.
बेपत्ता युवकाचा मृतदेह विहिरीत आढळला!
By admin | Updated: January 12, 2017 02:09 IST