शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

संग्रामपूर तालुक्यातील अल्पभूधारक शेतकर्‍याच्या मुलीला दहा पदके! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:30 IST

वरवट बकाल (बुलडाणा): आदिवासीबहुल असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील तामगाव येथील अल्पभूधारक शेतकर्‍याच्या  इंद्रायणी मुरलीधर गोमासे या मुलीने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३२ व्या दीक्षांत सोहळ्यात  सर्वाधिक पाच सुवर्णपदकांसह एकूण दहा पदके मिळवण्याची असामान्य कामगिरी केली.

ठळक मुद्देइंद्रायणी उभी राहिली अन् सभागृहात वाजल्या टाळ्या

लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल (बुलडाणा): आदिवासीबहुल असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील तामगाव येथील अल्पभूधारक शेतकर्‍याच्या इंद्रायणी मुरलीधर गोमासे या मुलीने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३२ व्या दीक्षांत सोहळ्यात  सर्वाधिक पाच सुवर्णपदकांसह एकूण दहा पदके मिळवण्याची असामान्य कामगिरी केली.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची पाच सुवर्णपदके मिळवण्याची असामान्य कामगिरी सदर  मुलीने सर्वाधिक पाच सुवर्णपदकांसह एकूण दहा पदके मिळवण्याची असामान्य कामगिरी केली आहे. बीएसस्सी कृषी पदवी परीक्षेत इंद्रायणी मुरलीधर गोमासे या विद्यार्थिनीने ही नेत्रदीपक कामगिरी केली. इंद्रायणीचे नाव घोषित होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. आदिवासीबहुल तालुका म्हणून संग्रामपूरची ओळख आहे. या तालुक्यातील तामगाव येथील मुरलीधर गोमासे या अल्पभूधारक शेतकर्‍याच्या मुलीने आई-वडिलांचे नाव समाजात झळकवले आहे.इंद्रायणी हिने जळगाव जामोद येथील कृषी महाविद्यालयात बीएसस्सी कृषीची पदवी घेतली. ही पदवी पूर्ण करताना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या विदर्भातील सर्व महाविद्यालयांमधून या पदवी परीक्षेत सर्वाधिक गुणांक प्राप्त केले. तसेच कीटकशास्त्र, वनस्पती रोगशास्त्र, कृषीविद्या या विषयात सर्वाधिक गुण मिळाले. 

अन् आई-वडिलांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या!मुरलीधर गोमासे यांना तीन मुली व एक मुलगा आहे. इंद्रायणी ही सर्वात मोठी असून, तिने कृषी शिक्षणात नेत्रदीपक कामगिरी केली. तिच्या या गौरव सोहळ्याला, दीक्षांत समारंभाला सोमवारी ५ फेब्रुवारी रोजी तिचे आई-वडील उपस्थित होते. यावेळी  कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पद्मभूषण तथा नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय भटकर, उमेशचंद्र सारंगी, डॉ. व्ही. एम. भाले यांच्या हस्ते इंद्रायणीचा गौरव होत असताना तिच्या शेतकरी आई-वडिलांच्या डोळ्यांच्या कडा आनंदाश्रूने पाणावल्या होत्या. संपूर्ण सभागृहाने टाळ्यांचा कडकडाट करून तिच्या या यशाला सलाम केला. सोहळ्यानंतरही विविध मान्यवरांनी इंद्रायणीची भेट घेऊन कौतुक केले.

मुरलीधर गोमासे यांची धडपड प्रेरणादायीमुरलीधर गोमासे यांच्याकडे तीन एकर शेती असून, पूर्वी बागायती असलेली ही शेती आता पाण्याअभावी कोरडवाहू झाली. अशाही परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत त्यांनी तीन मुली व मुलाचे शिक्षण सुरू ठेवले आहे. एक मुलगी कृषी पदवीधर, दुसरी इंजिनिअर तर मुलगाही इंजिनिअर होत आहे, हे विशेष! 

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठbuldhanaबुलडाणा