शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपूरवठा योजनांसंबंधी मंत्र्यांना चुकीची माहीती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:15 IST

बुलडाणा : अमरावती येथे पाणीपूरवठा मंत्रालयाच्यावतीने  घेण्यात आलेल्या बैठकीत पाणीपूरवठा मंत्री बबनराव लोणीकर  यांना जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांबाबत दिलेली माहिती  दिशाभूल करणारी असल्याचा आरोप माजी मंत्री सुबोध सावजी  यांनी केला आहे.   

ठळक मुद्देसुबोध सावजी यांचा आरोप अमरावती येथे पार पडली पाणीपुरवठा विभागाची बैठक 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : अमरावती येथे पाणीपूरवठा मंत्रालयाच्यावतीने  घेण्यात आलेल्या बैठकीत पाणीपूरवठा मंत्री बबनराव लोणीकर  यांना जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांबाबत दिलेली माहिती  दिशाभूल करणारी असल्याचा आरोप माजी मंत्री सुबोध सावजी  यांनी केला आहे.   अमरावती येथे पाणीपुरवठा विभागाची बैठक झाली. यावेळी  पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना अधिकार्‍यांकडून  बुलडाणा जिल्ह्यात फक्त २२ नळ पाणी पुरवठा योजनामध्ये  गैरव्यवहार आहे, तर सात योजनांची चौकशी होऊन कार्यवाही  सुरु असल्याची माहीती देण्यात आली. या पृष्ठभूमिवर माजी मंत्री  सुबोध सावजी यांनी पत्रक काढून ना. लोणीकर यांना आव्हान  दिले आहे. सावजी यांनी पत्रकात म्हटले आहे की, बुलडाणा  जिल्हा शासकीय नळपाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मुलन  समितीच्यावतीने जिल्हय़ातील नळयोजनांच्या कामामध्ये  संबंधीत यंत्रणशी संबंधीत लोकांकडून कमीत कमी दोन हजार  कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे कार्यकारी अभियंते, विभागीय  अधिकारी, राज्यस्तरीय अधिकारी मुख्यमंत्री व राज्यपाल  यांच्याकडे दिलेले आहे. तत्कालीन विभागीय आयुक्त, त त्कालीन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, विभागीय  आयुक्त, विद्यमान जिल्हाधिकारी विद्यमान कार्यपालन  अधिकारी, अमरावती विभागीय अधिकारी श्यामलाल गोयल,  अतिरिक्त मुख्य सचिव सुमित मलीक मुख्य सचिव यांच्यासोबत  चर्चा करुन या विषयावर समितीने बाजू मांडली.९0 टक्के  नळयोजनांमधून दररोज शुध्द पाणी पिण्यास मिळत नाही. अनेक  योजनांची कामे गेल्या पाच ते पंधर वर्षापासून बंद आहेत. उ पलब्ध निधीत योजना पूर्ण होत नाही या सबबीवर वाढीव निधी  मागितला जातो. झालेल्या निधीच्या खर्चाची अर्थात भ्रष्टाचाराची  कोणतीही चौकशी न होता टक्केवारीने वाढीव निधी मंजूर होतो,  असेही माजी मंत्री सावजी यांनी पत्रकात म्हटले आहे. २६  जानेवारी २0१८ पर्यंत जिल्हय़ातील भ्रष्टाचारावर कारवाई न  झाल्यास भ्रष्टाचाराला पाठीशी घालणार्‍यांचा खून करेल,  असा  इशाराही सावजी यांनी संबंधीत विभागाला दिला आहे.