अल्पवयीन मुलीच्या ३५ वर्षीय वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गावातीलच आरोपी संदीप वीर याने लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन लग्न केले. फिर्यादी आरोपीच्या घरी मुलीला पाहण्यासाठी गेले असता तेथे त्यांना मुलगी मिळून आली नाही. मुलगी ताब्यात द्या, असे म्हटले असता आरोपींनी संगनमत करून मुलगी घरी आणून सोडतो, असे सांगितले. परंतु त्यांनी तसे न करता घटनेतील मुख्य आरोपी संदीप वीर याच्यासोबत कुठेतरी पळवून लावले. त्यानुसार फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला आरोपी संदीप वीर, नवनाथ वीर, गजानन वीर, तुळशीराम शेळके, संजय गंगाराम शेळके, दीपक गंगाराम शेळके, सोमनाथ शेळके यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण खाडे करीत आहेत.
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:41 IST