शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मिनी हायमास्ट निविदा : खामगावच्या नगराध्यक्ष चौकशीच्या फेऱ्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 15:19 IST

मिनी हायमास्ट प्रकरणी तीन कंत्राटदार आणि नगराध्यक्षांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: नागरी दलितवस्ती योजनेतंर्गत मिनी हायमास्ट लावण्यासाठी एकाच कंत्राटदाराने २० कामांच्या पूरक निविदांसह ६० निविदा भरल्याच्या प्रकरणी खामगाव नगर पालिकेच्या नगराध्यक्षांच्या चौकशीच्या फेºयात अडकल्या आहेत. मिनी हायमास्ट प्रकरणी तीन कंत्राटदार आणि नगराध्यक्षांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.नागरी दलित वस्ती योजनेतंर्गत खामगाव शहरातील विविध भागात मिनी हायमास्ट लावण्यासाठी आपल्या निविदेसह दोन पूरक(सर्पोटींग) निविदा पालिकेला सादर केल्या आहेत. शहरातील २० कामांच्या ४० पुरक निविदांसह सर्व ६० निविदा एकाच कंत्राटदाराने भरल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात स्वीकृत नगरसेवक संदीप वर्मा यांनी २३ आॅगस्ट २०१९ रोजी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवर कोणतीही कारवाई न झाल्याने वर्मा यांनी पुन्हा २१ नोव्हेंबर रोजी पुन्हा स्मरणपत्र देत तक्रारीस उजाळा दिला आहे. दरम्यान, नगरसेवक वर्मा यांच्या तक्रारीवरून मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी तातडीने चौकशी समिती नेमली आहे. यासमितीने निविदा दाखल करणाºया पॉवर केअर इन्टरप्राईजेस, सिध्दी इलेक्ट्रीकल्स अ‍ॅन्ड सर्व्हीसेस आणि एबी इलेक्ट्रीकल्स अ‍ॅन्ड सर्व्हीसेस या कंपनीच्या संचालकांना आणि नगराध्यक्षा अनिता डवरे यांना समितीसमोर आपली बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे. सोबतच तक्रारदार संदीप वर्मा यांनाही यावेळी आपली बाजू मांडण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. पेच सोडवा; कंत्राटदारांचे साकडे !मिनी हायमास्ट निविदा प्रकरणी तक्रार दाखल झाल्याने तीन कंत्राटदारांची चांगलीच भंबेरी उडाली आहे. चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने कंत्राटदारांकडून सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे या पेचातून सुटका करण्यासाठी चकरा वाढल्या आहेत.मिनी हायमास्ट निविदाप्रकरणी चौकशी करण्यासाठी आपणच पुढाकार घेतला आहे. निविदा आॅनलाईन पध्दतीने दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आपल्या हस्तक्षेपाचा प्रश्नच उद्भवत नाही. याप्रकरणी आपली बाजू मांडण्यासाठी आपणांस अद्यापपर्यंत कोणतीही नोटीस प्राप्त झालेली नाही. पारदर्शी चौकशीची आपली मागणी आहे.- अनिता डवरेनगराध्यक्षा, खामगाव.निविदा प्रक्रीया ते वर्कआॅर्डर पूर्वीच्या प्रक्रीयेदरम्यान आपण याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यावेळी आपल्या तक्रारीत तथ्य नाही, असा शेरा देत अध्यक्षांनी याप्रकरणी कार्यादेश देण्याचे सुचविले. त्यामुळे कुठेतरी पाणी मुरत आहे. दरम्यान या निविदा मॅनेज करण्यात सत्ताधारी पक्षाच्या एका नगरसेवकाचा महत्वपूर्ण सहभाग राहीला आहे.- संदीप वर्मातक्रारदार तथा स्वीकृत नगरसेवक, खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव