शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णालयातील लाखो रुपयांचे यंत्र धूळ खात! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:51 IST

देऊळगावमही: येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी  आलेल्या रुग्णांना विविध तपासण्यांसाठी शहराच्या ठिकाणी  किंवा खासगी डॉक्टरकडे पाठविण्यात येते; मात्र रुग्णालयातच  लाखो रुपयांचे यंत्र बंद खोलीत धूळ खात पडले असल्याचे  लोकमतने सोमवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान निदर्शनास  आले. तसेच रुग्णालयातच कमालीची अस्वच्छता आढळून  आली.

ठळक मुद्देस्टिंग ऑपरेशन डॉक्टरांची हलगर्जीयंत्र असल्यावरही तपासण्या नाहीत

प्रकाश साकला। लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावमही: येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी  आलेल्या रुग्णांना विविध तपासण्यांसाठी शहराच्या ठिकाणी  किंवा खासगी डॉक्टरकडे पाठविण्यात येते; मात्र रुग्णालयातच  लाखो रुपयांचे यंत्र बंद खोलीत धूळ खात पडले असल्याचे  लोकमतने सोमवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान निदर्शनास  आले. तसेच रुग्णालयातच कमालीची अस्वच्छता आढळून  आली.येथील ग्रामीण रुग्णालयात लाखो रुपयांचे यंत्र उपलब्ध  असल्यावरही त्याचा कोणताही वापर न करता रुग्णांची तपासणी  करण्यात येत नाही. परिणामी रुग्णांना खासगी डॉक्टरकडे जावे  लागते. देऊळगाव राजा तालुक्यातील सर्वात मोठे समजले  जाणारे ३0 खाटांचे शासकीय ग्रामीण रुग्णालय सद्यस्थितीत  स्वच्छतेअभावी  सलाइनवर असून, कामचुकार कर्मचार्‍यांच्या  मनमानी कारभारामुळे रुग्णालयात घाणीचे साम्राज्य पसरले  असून, परिसरात मोठय़ा प्रमाणात दुर्गंधी येत आहे.      रुग्णालयाचे वैद्यकीय  अधीक्षक अशा कामचुकार कर्मचार्‍यांवर  कुठल्याच प्रकारची कार्यवाही करत नसून, त्यांचा परिणामी  रुग्णालयात येणार्‍या रुग्णांच्या आरोग्यावर होत आहे. रुग्णालयाच्या परिसरात असलेले स्वच्छतागृह गेल्या कित्येक  दिवसांपासून साफ केले आहे. तसेच प्रसृतिगृहात कुठल्याच  प्रकारची साफसफाई होत नाही. रुग्णालयाच्या परिसरात कचरा  साचलेला आहे.        तसेच येथील काही कर्मचारी आपले काम  खासगी व्यक्तीकडून करून घेतात व कर्तव्यावर गैरहजर राहत  असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहे.  कर्मचारी रुग्णालयात कुठल्याच  प्रकाराची वेळ पाळत  नाहीत.  शासनाने रुग्णालयात ‘थंब मशीन’ बसवलेली असून, त्याचाही  वापर कर्मचारी करीत नाहीत. रुग्णालयात महत्त्वाचा औषध  साठा उपलब्ध नाही. कर्मचार्‍यांवर कुठल्याच प्रकारचा वचक वैद्यकीय अधीक्षकांचा  राहिलेला नाही. या सर्व प्रकारासंदर्भात येथिल भाजपा शहर  अध्यक्ष कैलास राऊत यांनी वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन दिले  असून, येत्या १५ दिवसात सर्व समस्या मार्गी लावा अन्यथा  जनआंदोलन उभारू, असा इशारा  त्यांनी दिला.        

३0 खाटांच्या रुग्णालयात २१ खाटा  ग्रामीण रुग्णालयात ३0 खाटांना मंजुरी आहे; मात्र रुग्णालयात  केवळ २१ खाटाच आहेत. येथे दाखल झालेल्या रुग्णांना  अनेकदा जागा नसल्यामुळे दाखल होण्याकरिता देऊळगाव राजा  किंवा बुलडाण्याला पाठविण्यात येते. 

रुग्णालयातील साफसफाई संदर्भात कर्मचार्‍यांना आदेश दिले  आहेत. लवकरच सर्व समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करू.  रुग्णालयात पुरेसा औषध साठा नसून, रुग्णसेवेत अडचण  निर्माण होत आहे तसेच काही अधिकारी व कर्मचारी यांची पदे  रिक्त असून, लवकरात लवकर मा. उपसंचालकांनी पदे भरावी,  अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली. - डॉ.जे.पी. ताठे, वैद्यकीय अधीक्षक