शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
3
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
4
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
5
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
6
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
7
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
8
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
9
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
10
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
11
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
12
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
13
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
14
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
15
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
16
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
17
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
18
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
19
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
20
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

तेल्हारा जलाशयातील लाखो लिटर पाणी गेले वाया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 12:48 AM

तालुक्यातील तेल्हारा येथील जलाशयाचे नादुरूस्त  असलेले गेट दुरूस्त करून पाण्याचा विसर्ग थांबवावा, अशी  वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्यामुळे पिके धोक्यात आली असून,  दोषी कर्मचार्‍यांवर  कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

ठळक मुद्देदोषी कर्मचार्‍यांवर फौजदारी कारवाईची शेतकर्‍यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : तालुक्यातील तेल्हारा येथील जलाशयाचे नादुरूस्त  असलेले गेट दुरूस्त करून पाण्याचा विसर्ग थांबवावा, अशी  वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे लाखो लिटर  पाणी वाया गेल्यामुळे शेतकर्‍यांची पिके धोक्यात आली असून,  याची गंभीरतेने दखल घेऊन संबंधित दोषी कर्मचार्‍यांवर  फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या पाण्यावर  विसंबून असलेल्या शेतकर्‍यांनी केली आहे.याबाबत जिल्हाधिकारी बुलडाणा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले  आहे की, तेल्हारा जलाशयाचे गेट गेल्या अनेक वर्षांपासून  नादुरूस्त असल्याने त्यातून या जलाशयातील पाणी वाया जाते.  याबाबत संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना वारंवार गेट दुरूस् तीबाबत सांगुनही शेतकर्‍यांच्या मागणीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष  करण्यात येत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. तसेच  ‘पाणी वाया जावू द्यायचे नसेल, तर तुमचे तुम्हीच करून घ्या’,  असे उर्मटपणाचे उत्तरही सिंचन विभागाच्या संबंधित  कर्मचार्‍यांकडून दिल्या गेल्याने या जलाशयातून उपसा पद्धतीने  पाणी घेणार्‍या शेतकर्‍यांनी माती टाकून पाणी अडविले होते; मात्र  संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांनी ती माती जेसीबीच्या सहाय्याने  बाजूला करण्यासोबत पुन्हा शेतकर्‍यांनी असे करू नये, यासाठी  त्याठिकाणी मोठ्ठा खड्डादेखील करून ठेवला असल्याने दरवर्षी या  जलाशयातून पाणी वाया जाते. तर यावर्षी आधिच पाणीसाठा कमी असून, त्यात पाणी वाया  गेल्यामुळे शेतकर्‍यांची पिके व खरीप हंगाम धोक्यात आला  असल्याने शेतकर्‍यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून त्यांना पाण्या पासून वंचित ठेवण्यासह पाणी वाया घालविणार्‍या व कर्तव्यात  कसूर करणार्‍या दोषी अधिकारी व कर्मचार्‍यांवर फौजदारी दाखल  करण्यात यावी व या जलाशयाचे गेट तातडीने दुरूस्त करून  द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला  आहे. या निवेदनावर विनायक सरनाईक, गजानन ठेंग, o्रावण  बडगे, रोहन गिरणारे, गौतम साळवे, तुकाराम साळवे, भाऊराव  सरनाईक, टी. आर. ठेंग, डी.बी.ठेंग, गौतम साळवे, पुरूषोत्तम  ठेंग, व्ही.बी.ठेंग, सुधाकर पंडागळे आदी शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या  आहेत. 

टॅग्स :Waterपाणी