शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

लाखो हेक्टरवरील पीक धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:37 IST

लांबलेला पावसाळा आणि हवामानातील  बदलामुळे जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील कपाशी  आणि सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे.  क पाशीवर रसशोषक आणि गुलाबी बोंडअळीचे  आक्रमण असून, पाने खाणार्‍या अळींचा प्रादुर्भाव  झाला आहे. परिणामी, कपाशीच्या ४ लाख दोन हजार  ३४५ हेक्टरपैकी निम्म्या क्षेत्रावर तर सोयाबीनच्या १  लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ६५ हजार हे क्टरवरील पीक धोक्यात असल्याची शक्यता व र्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देगुलाबी बोंड अळीच्या संक्रमणाचाही धोका!शेतकरी संकटात

अनिल गवई । लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  लांबलेला पावसाळा आणि हवामानातील  बदलामुळे जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील कपाशी  आणि सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे.  क पाशीवर रसशोषक आणि गुलाबी बोंडअळीचे  आक्रमण असून, पाने खाणार्‍या अळींचा प्रादुर्भाव  झाला आहे. परिणामी, कपाशीच्या ४ लाख दोन हजार  ३४५ हेक्टरपैकी निम्म्या क्षेत्रावर तर सोयाबीनच्या १  लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ६५ हजार हे क्टरवरील पीक धोक्यात असल्याची शक्यता व र्तविण्यात येत आहे.बुलडाणा जिल्ह्याचे कापसाचे एकू ण सरासरी क्षेत्र  २  लाख ४४  हजार ४३0 हेक्टरचे आहे. यापैकी  जिल्ह्यात १ लाख ७५ हजार ५ हेक्टरवर प्रत्यक्षात का पसाचा पेरा झाला आहे. तथापि, सुरुवातीला पावसात  पडलेला खंड आणि त्यानंतर वातावरणातील  बदलामुळे  वाढलेल्या तापमानामुळे  कपाशी पिकावर  रस शोषक कीड, तुडतुडे,  फुलकिडे, पांढरी माशी  आणि लाल कोळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. घाटाखालील खामगाव, जळगाव जामोद, मलकापूर  शेगाव सोबतच घाटावरील लक्षावधी हेक्टरला  फटका बसला आहे. रसशोषक किडीने कपाशीच्या  पानातील अन्नद्रव्ये शोषण केल्याने पाने कोकडल्या  गेली आहेत. परिणामी, उत्पादनात मोठय़ा प्रमाणात  फटका बसणार असल्याची शक्यताही कृषि क्षेत्रातील  तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.

शेतकरी संकटात-जिल्ह्यातील काही भागात बी.टी. नैसर्गिकरीत्या  येणारी बोंडअळी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात  दिसून आल्यामुळे धोक्याची घंटा वाजली आहे. वेळे पूर्वीच दिसून आलेल्या बोंडअळीमुळे कपाशीचे  नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- कपाशीच्या बोंडात येणारी गुलाबी बोंडअळी  लवकर लक्षात येत नसल्याने शेतकर्‍यांनी नियमित  िपकातील हिरवी बोंडे फोडून आतमध्ये पाहणे  आवश्यक आहे.- या अळीच्या सर्वेक्षणासाठी कामगंध सापळ्यांचा  वापर करावा, सर्वेक्षणासाठी एकरी दोन कामगंध सा पळे आणि पतंग पकडण्यासाठी ८ ते १0 सापळे  करावेत. - प्रादुर्भावग्रस्त गळालेली पाने व बोंडे जमा करून  नष्ट कराव्यात. कामगंध सापळ्यात ८-१0 पतंग  सलग तीन रात्री किंवा ५-१0 प्रादुर्भावग्रस्त बोंडे  असल्यास रासायनिक औषधाचा वापर करावा. काही  ठिकाणी पांढरी माशी आणि किडीचाही प्रादुर्भाव  होण्याची शक्यता आहे.

परिसरात वातावरणातील बदल व तापमानामुळे क पाशी आणि सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत  आहे. या गोष्टीला न घाबरता शेतकर्‍यांनी कपाशी व  सोयाबीन पिकाची नियमित पाहणी करावी व वेळीच  प्रादुर्भावग्रस्त किडींच्या नियंत्रणासाठी एकात्मिक  कीड नियंत्रणाचा मार्ग अवलंबावा. काही अडचण  आल्यास कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचार्‍यांशी संपर्क  साधावा.- एन.के. राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी,  खामगाव.