शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

लॉकडाऊन काळात दूध उत्पादक, डेअरीचालकांना मुभा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:52 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दूध उत्पादक व विक्रेत्यांना घेऊन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्याशी भेटून चर्चा केली. ...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दूध उत्पादक व विक्रेत्यांना घेऊन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्याशी भेटून चर्चा केली. आयुक्त पीयूष सिंग यांच्याशी फोनवरून चर्चा करून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. तुपकरांची मागणी लक्षात घेऊन आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दूध उत्पादक व विक्रेत्यांना सूट देण्यासंदर्भात निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनचे आदेश पारित करताना त्यामध्ये दूध उत्पादकांना, संकलन व वितरण केंद्रांना हवी असलेली सुधारित वेळ ठरवून दिली.

आता सकाळी ६ ते दुपारी ३ आणि सायंकाळी ६ ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत दूध उपलब्ध राहणार आहे. म्हणजेच सकाळपासून दुपारपर्यंतचे ९ तास आणि सायंकाळचे अडीच तास त्यांना मिळणार आहेत. रविकांत तुपकर यांनी हा प्रश्न रेटून धरल्याने त्यावर प्रशासनाला तत्काळ निर्णय घेणे भाग पडले. यामुळे दूध उत्पादक, विक्रेते व संकलन केंद्र संचालकांना दिलासा मिळाला आहे. दुधावर अनेक शेतकऱ्यांचा चरितार्थ चालतो. सोबतच दूध विक्रेते व संकलनकर्त्यांची कुटुंबे अवलंबून आहेत. अमरावती विभागात कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता अंशत: लॉकडाऊन सुरू झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी लागू करून सर्वांसाठी नियम घालून दिले आहेत. दुग्ध व्यवसाय व दुग्धजन्य व्यवसाय करणाऱ्यांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशी वेळ ठरवून देण्यात आली होती. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ही बाब स्वागतार्ह असली तरी दूध उत्पादक शेतकरी व व्यावसायिकांचे यामुळे नुकसान होणार असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी २२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांची भेट घेतली.

शेतकऱ्यांची अडवणूक

ग्रामीण भागातून बुलडाण्याकडे दूध आणणाऱ्या शेतकऱ्यांना सकाळी पोलिसांनी अडविले. त्याचप्रमाणे दूध डेअरी व संकलन केंद्रवाल्यांचीही अडवणूक करण्यात आली. आधीच मागील लॉकडाऊनमध्ये कंबरडे मोडले, यावेळीही आर्थिकदृष्ट्या आपण खचून जाऊ म्हणून या सर्वांनी रविकांत तुपकरांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची विनंती केली. तुपकर यांनी प्रशासनाला दुधाचा प्रश्न मार्गी लावण्यास बाध्य केले.