शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

बुलडाणा जिल्ह्यातील दूध संकलनात झाली घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 11:26 IST

Milk collection in Buldana district declined : के‌वळ १९ दुग्ध संस्थाच दूध संकलन करीत असल्याने, बुलडाणा जिल्ह्यातील दूध आटले असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

- भगवान वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कृषिप्रधान असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला चांगलीच मरगळ आली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत तुटपुंजे दूध संकलन सुरू असून, तब्बल ५०८ दुग्ध संस्था अवसायनात निघाल्या आहेत. के‌वळ १९ दुग्ध संस्थाच दूध संकलन करीत असल्याने, बुलडाणा जिल्ह्यातील दूध आटले असे म्हटल्यास वावगे ठरू नये.शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. या व्यवसायाकडे काही प्रमाणात शेतकरी वळतातही. मात्र, मागील काही वर्षांपासून हा व्यवसाय डबघाईस आला असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत दुग्ध संकलन तुटपुंज्या स्थितीत असून, शेतकऱ्यांनी एक प्रकारे याकडे दुर्लक्षच केले असल्याची स्थिती आहे. जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात दर दिवसाला ५० हजार लीटर दूध संकलन अपेक्षित होते. मात्र, आता केवळ १९ संस्थांकडून केवळ ६२४ लीटर एवढेच दूध संकलन होत असल्याची स्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून संकलन केलेले हे तुटपुंजे दूध घेऊन ते शीतकरण केंद्राला देणेही जिल्हा दुग्ध संस्थेला परवडत नसल्याचे सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांना प्रति लीटर २५ रुपये दर देऊनही मोठ्या प्रमाणात दूध संकलन होत नसल्याची स्थिती आहे. मदर डेअरी उपक्रमातंर्गतही बुलडाण्यात दुग्धोतपादनात वाढ करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. पण अपेक्षीत उत्पदनात वाढ झालेली नाही. जिल्ह्यातील ८० टक्के दुग्धोत्पादन संस्था या अवसायनात गेलेल्या आहेत.यासाबेतच जिल्हयातील तीन शितकरण यंत्रणी बंद पडलेले आहेत. त्यामुळे दुग्धोत्पादनाला जिल्ह्यात चालना देण्याची गरज निर्माण झाली आहे.१९ संस्थांकडून दूध संकलनजिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील १९ संस्थाच फक्त दूध संकलन करीत आहेत. यामध्ये तुळजा भवानी महिला संस्था, गोपाल, संत महंत कुंभारी, महात्मा जोतिबा फुले गिरोली बु., तुळजा माता महिला दुग्ध संस्था गिरोली बु., अनुसया माता दुग्ध संस्था गिरोली बु., बालाजी महिला सावखेड भोई, कामधेनू दुग्ध संस्था सावखेड भोई,  कै. भास्करराव शिंगणे जांभोरा, महिला दुग्ध संस्था जांभोरा, माउली दुग्ध संस्था चिंचाेली बुरुकूल, विठ्ठल दुग्ध संस्था देऊळगाव राजा, दत्तदिगंबर दुग्ध संस्था सावखेड भोई, स्वामी विवेकानंद जवळखेड, व्यंकटेश दुग्ध संस्था देऊळगाव राजा, खडकपूर्णा दुग्ध संस्था देऊळगाव मही आणि सावता दुग्ध संस्था देऊळगाव राजा. या १९ संस्थामध्ये दिवसाला ४९९ लीटर तर सिंदखेडराजा येथील दोन संस्थांमध्ये ५७ लीटर आणि मेहकरच्या बालाजी दुग्ध संस्थेत १६९ लीटर दूध संकलन केले जात आहे. 

सध्या दूध संकलनाचा काळ नसून, दुधाळ जनावरांना  लागणारा चारा उपलब्ध नाही. यामुळेच सध्या ६५० लीटरच्या जवळपासच दूध संकलन होत आहे. ऑक्टोबर नोव्हेंबरनंतर दूध संकलनाला गती मिळण्याची शक्यता आहे. - ए. व्ही. भोयर, सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMilk Supplyदूध पुरवठा