शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सूक्ष्म सिंचनाचे १३ कोटींचे अनुदान रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 16:48 IST

Buldhana News जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जवळपास १२ कोटी ८४ लाख रुपयांचे हे अनुदान थकीत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: एकीकडे जिल्ह्याचे अर्थकारण हे अनलॉकच्या प्रक्रियेमुळे पूर्वपदावर येत असले तरी जिल्ह्यातील ४ हजार ४७५ शेतकऱ्यांचे सूक्षम सिंचनाचे अर्थात ठिबक व तुषार संचाचे अनुदान रखडलेले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जवळपास १२ कोटी ८४ लाख रुपयांचे हे अनुदान थकीत आहे. कोरोना संसर्गामुळे मधल्या काळात प्रशासकीय पातळीवर अडचणी होत्या. कृषी विभागाकडे निधी उपलब्धतेची अडचण होती. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात हे अनुदान मिळू शकले नाही. या व्यतिरिक्त बुलडाणा जिल्ह्यातील सामूहिक शेततळ्यांचे, शेडनेट आणि कांदा चाळीचे अनुदानही शासनस्तरावर रखडलेले आहे. त्यामुळे आता अनलॉकच्या प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांच्या रखडलेल्या या अनुदानाचाही विचार होऊन त्यांना हे अनुदान मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात मुळातच सिंचनाचा मोठा अनुशेष आहे. त्यातच पाण्याच्या बचतीसोबतच उत्पादन वाढीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाकडे वळविण्याचे प्रयत्न होत आहे. त्या माध्यमातूनच सुरू असलेल्या कृषी विभागांतर्गतच्या या योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची भूमिका निभावत आहे; मात्र चालू आर्थिक वर्षात कोरोनामुळे प्रशासकीय पातळी निधीच्या उपलब्धतेची समस्या निर्माण झाली होती. आता बऱ्यापैकी या समस्या सुटत असल्या शेतकरी शेतकऱ्याला प्राधान्याने त्याचे थकीत अनुदान मिळण्याची गरज निर्माण झाली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीमुळेही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याची पहिल्या टप्प्यातील नुकसान भरपाईही शेतकऱ्यांना मिळालेली आहे. त्यातच आता छोट्या व मोठ्या शेतकऱ्यांचे हे रखडलेले अनुदान त्यांना उपलब्ध होण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोना संसर्ग व तत्सम कारणामुळे हे अनुदान शासनस्तरावर रखडलेले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी