शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१९६ व्यवस्थापनाच्या रिक्त जागांसाठी उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर

By संदीप वानखेडे | Updated: July 16, 2023 17:35 IST

सन २०१७ मध्ये शासनाने घेतलेल्या शिक्षक अभियाेग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती सुरू आहे.

बुलढाणा : पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून सन २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या अभियाेग्यता परीक्षेतील गुणांच्या आधारे १९६ व्यवस्थापनाच्या मुलाखतीसह जागांसाठी १५ जुलै राेजी रात्री उशिरा गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे़ एका जागेसाठी दहा उमेदवारांची शिफारस पाेर्टलच्या माध्यमातून करण्यात आहे़ या दहा उमेदवारांमधून मुलाखत आणि अध्यापन काैशल्याच्या आधारावर एका उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे़.

सन २०१७ मध्ये शासनाने घेतलेल्या शिक्षक अभियाेग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती सुरू आहे. पाच वर्षांचा कालावधी लाेटल्यानंतरही विविध कारणांमुळे ही भरती अजूनही पूर्ण झालेली नाही़ १९६ व्यवस्थापनाच्या मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या उमदेवारांचे प्राधान्यक्रम नुकतेच घेण्यात आले हाेते़ त्यानंतर १५ जुलै राेजी रात्री पवित्र पाेर्टलवर एका जागेसाठी दहा उमेदवारांची शिफारस गुणाक्रमानुसार करण्यात आली आहे़ येत्या १८ जुलै ते ११ ऑगस्टपर्यंत व्यवस्थापनांना मुलाखत प्रक्रिया पूर्ण करून उमेदवारांची निवड करावी लागणार आहे.

पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून मुलाखतीसह आणि मुलाखतीविना अशा दाेन पद्धतीने शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत आहे़ त्यातच आतापर्यंत मुलाखतीसह निवडलेल्या ५६१ व्यवस्थांनाच्या दाेन हजार ६१ जागांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे़ तसेच १९६ व्यवस्थापनाच्या एसईबीसी प्रवर्गासाठी जागा याेग्य प्रवर्गामध्ये घेऊन पात्र उमेदवारांकडून नव्याने प्राधान्यक्रम घेण्यात आलेल्या आहेत़ या १९६ व्यवस्थापनाच्या मुलाखतीसह पदभरतीसाठी मुलाखत व अध्यापन काैशल्यासाठी उमेदवारांची पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून शिफारस करण्यात आली आहे़

व्यवस्थापनांना उमेदवार निवडीचे अधिकार

पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून १९६ व्यवस्थापनांच्या इयत्ता ६वी ते १२वी गटातील रिक्तपदासाठी एका जागेसाठी दहा उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे़ या दहा उमदेवारांमधून मुलाखत व अध्यापन काैशल्याच्या आधारे एका उमेदवाराची निवड करण्याचे अधिकारी व्यवस्थापनांना आहेत़

रिक्त जागांसाठी विशेष राउंड घेणार

सन २०१७ च्या शिक्षक अभियाेग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणवत्तेनुसार ९ ऑगस्ट २०१९च्या फेरीमध्ये पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे रिक्त राहिलेल्या जागांसाठी माजी सैनिक यांची स्वतंत्र विशेष निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे़ यामध्ये माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास रिक्त राहिलेल्या जागांपैकी १० टक्के जागा रिक्त ठेवून उर्वरित जागांसाठी त्या त्या प्रवर्गाच्या सर्वसाधारणमध्ये रूपांतरीत करून या जागांसह अपात्र, गैरहजर यांच्या रिक्त जागांसाठी एक राउंड घेण्यात येणार आहे़

टॅग्स :buldhanaबुलडाणा