शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता कामाच्या भूमीपूजनाचा बुलडाणा पालिकेचा केवळ देखावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 15:55 IST

पालिका प्रशासनाने खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून रस्त्याची केवळ डागडुजीच केली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहरातील खड्ड्यांच्या दुखण्यावर ठोस उपाययोजना करण्याऐवजी केवळ भुमीपूजन करून येथील नगरपालिकेच्या वतीने वेळ मारून नेण्याचे काम करण्यात आले आहे. या रस्त्याच्या भूमीपूजनाला जवळपास महिना उलटूनही अद्याप कामाला सुरूवात करण्यात आली नाही. रस्त्याच्या कडेला केवळ बांधकाम साहित्य टाकून काम सुरू असल्याचा देखावा करण्यात येत असून यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संपाप व्यक्त होत आहे.बुलडाणा शहरातील काही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यांची ही अवस्था आहे. यासंदर्भात नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनदेखील तात्पुरत्या मलपट्टीशिवाय ठोस पाऊल पालिकेच्या वतीने उचलण्यात आले नाही. ऐन पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या खड्ड्यांची संख्या वाढल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. संगम चौक ते तहसील चौक हा शहरातील सर्वात जास्त वर्दळीचा रस्ता आहे. चिखली व खामगाकडे ये-जा करण्यासाठी जड वाहने वगळता इतर वाहनांसाठी हा जवळचा रस्ता आहे. तहसील कार्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी देखील हाच प्रमुख मार्ग आहे. पालिका प्रशासनाने खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून रस्त्याची केवळ डागडुजीच केली. यावर्षी सतत पाऊस सुरू असल्याने दुसऱ्याच दिवशी रस्त्याची जैसे थे अवस्था झाल्याने डागडुजीचा कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नव्हता. अखेर महिनाभरापूर्वी आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते या रस्ता कामाचे भूमीपूजन करण्यात आले. मात्र आतापर्यंत कामास सुरूवात न झाल्याने नागरिकांमधून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त होत आहे. संगम चौक ते तहसील चौक रस्त्याच्या कामाला लवकरच सुरूवात करण्यात येईल. या रस्त्याचे काम सोपविण्यात आलेल्या ठेकेदाराला यासंदर्भात तत्काळ सूचना देऊन काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात येतील. नागरिकांची गैरसोय टाळण्याबाबत काळजी घेण्यात येईल.- अभिमन्यू केसकर,अभियंता, नगर परिषद बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणा