मेहकर : पेरणीचे दिवस जवळ आल्याने पिककर्ज घेण्यासाठी शेतकरी विविध बँकेकडे धाव घेत आहे. शेतकºयांना पेरणीच्या वेळेवर पिककर्ज मिळावे, यासाठी तहसिलदार संतोष काकडे यांनी ११ जून रोजी मेहकर शहरासह तालुक्यातील सर्व बॅकांना भेटी देऊन पिककर्जाचा आढावा घेतला . शासनाने शेतकºयांचे पीक कर्ज माफ केले आहे; परंतू पीक कर्जमाफी संदर्भात अनेक शेतकरी अजुनही संभ्रमात आहेत. नविन पिककर्ज घेण्यासाठी सर्व राष्ट्रीयीकृत बँकेकडून नविन कागदपत्र मागविण्यात येत आहेत. बँकेचा जुना खातेदार असेल तर नविन कागदपत्राची गरज काय असे असतानाही सर्व बँकेवाले शेतकºयांकडून नविन कागदपत्र घेत आहे. यासाठी शेतकºयाला जवळपास आडीच ते तीन हजार रूपये खर्च येत आहे. एवढे करूनही पीककर्ज वेळेवर मिळेल काय, यासाठी शेतकºयांची धावपळ सूरू झाली आहे. शेतकºयांना वेळेवर पिककर्ज मिळावे, संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना कोणताही त्रास न होता वेळेवर अनुदान मिळाव, यासाठी तहसिलदार संतोष काकडे यांनी मेहकर शहरातील स्टेट बँक, सेंट्रल बँक, विदर्भ कोकण बँक, ग्रामीण बँक तसेच नायगाव दत्तापूर, जानेफळ, डोणगांव बॅकेमध्ये जाऊन बँक व्यवस्थापकाची भेट घेतली. शेतकºयांना पीककर्ज वाटप करताना वेळेवर वाटप करा, काही अडचणी असल्यास त्या अडचणी दूर करा, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थांना वेळेवर अनुदान वाटप करा यासंदर्भात चर्चा करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
मेहकर तहसिलदारांनी घेतला पीक कर्जाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 15:22 IST
तहसिलदार संतोष काकडे यांनी ११ जून रोजी मेहकर शहरासह तालुक्यातील सर्व बॅकांना भेटी देऊन पिककर्जाचा आढावा घेतला .
मेहकर तहसिलदारांनी घेतला पीक कर्जाचा आढावा
ठळक मुद्देनविन पिककर्ज घेण्यासाठी सर्व राष्ट्रीयीकृत बँकेकडून नविन कागदपत्र मागविण्यात येत आहेत. यासाठी तहसिलदार संतोष काकडे यांनी मेहकर शहरातील स्टेट बँक, सेंट्रल बँक, विदर्भ कोकण बँक, ग्रामीण बँक तसेच नायगाव दत्तापूर, जानेफळ, डोणगांव बॅकेमध्ये जाऊन बँक व्यवस्थापकाची भेट घेतली. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थांना वेळेवर अनुदान वाटप करा यासंदर्भात चर्चा करण्यात आली.