शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

महाआवास अभियानात मेहकर पं. स. जिल्ह्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:40 IST

मेहकर : महाराष्ट्र शासनाचा उपक्रम महाआवास अभियानअंतर्गत प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून मेहकर पंचायत समितीला प्रथम ...

मेहकर : महाराष्ट्र शासनाचा उपक्रम महाआवास अभियानअंतर्गत प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून मेहकर पंचायत समितीला प्रथम पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्त महाराष्ट्र शासन राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण, मुंबई यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बुलडाणा येथे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते मेहकर पंचायत समितीच्या शिवसेनेच्या सभापती नीताताई दिलीपराव देशमुख व गटविकास अधिकारी आशिष पवार यांना प्रमाणपत्र, ट्राॅफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, आमदार संजय गायकवाड, जिल्हा परिषद उपाध्यक्षा कमलताई बुधवत, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मेहकर तालुकाअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रपत्र ब मधील १३९५ लाभार्थींना १०० टक्के घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. आजपावेतो १०१६ लाभार्थ्यांची घरकुले शौचालयासह बांधकाम पूर्ण झाले आहे. ३७९ घरकुले प्रगतीत आहेत. तसेच राज्य पुरस्कृत योजनांमध्ये १२५३ घरकुले मंजूर असून आजपावेतो ९९२ घरकुले पूर्ण असून २६१ घरकुले बांधकाम प्रगतीत आहेत.

४४१ लाभार्थ्यांना दिली जागा

तालुक्यातील जागा नसलेल्या एकूण ४४१ लाभार्थीना पंडित दीनदयाळ उपाध्याय अर्थसाहाय्य योजना आणि नियमानुकूल करून जागा उपलब्ध करून त्यांना घरकुले मंजूर करण्यात आलेली आहेत. सर्व घरकूल योजने अंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना पंडित दीनदयाळ योजना तसेच अतिक्रमण नियमानुकूल करून देऊन १०० टक्के मंजुरी तसेच घरकूल पूर्ण करण्यात मेहकर पंचायत समिती प्रथम आहे. यासाठी अभियान कालावधीत सर्व स्थापत्य अभियांत्रिकी सहायक तसेच ग्रामीण गृह अभियंता यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, प्रकल्प संचालक चोपडे तसेच गटविकास अधिकारी आशिष पवार यांच्या मार्गदर्शनात घरकुल लाभार्थींना भेटी देऊन त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून घरकुले पूर्ण करवून घेतली.