शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महाआवास अभियानात मेहकर पं.स. जिल्ह्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:36 IST

मेहकर : महाराष्ट्र शासनाचा उपक्रम महाआवास अभियानअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणअंतर्गत विविध उपक्रमाच्या माध्यमातून मेहकर पंचायत समितीला प्रथम पुरस्कार मिळाला ...

मेहकर : महाराष्ट्र शासनाचा उपक्रम महाआवास अभियानअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणअंतर्गत विविध उपक्रमाच्या माध्यमातून मेहकर पंचायत समितीला प्रथम पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्त महाराष्ट्र शासन राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण, मुंबई यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बुलडाणा येथे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते मेहकर पंचायत समितीच्या शिवसेनेच्या सभापती नीताताई दिलीपराव देशमुख व गटविकास अधिकारी आशिष पवार यांना प्रमाणपत्र, ट्राॅफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी जि.प. अध्यक्षा मनीषा पवार, आ. संजय गायकवाड, जि.प. उपाध्यक्षा कमलताई बुधवत, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मेहकर तालुकाअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रपत्र ब मधील १३९५ लाभार्थीना १०० टक्के घरकुले मंजूर करण्यात आली आहेत़ आजपावेतो १०१६ लाभार्थ्यांचे घरकुले शौचालयासह बांधकाम पूर्ण झाले आहे. ३७९ घरकुले प्रगतीत आहेत. तसेच राज्य पुरस्कृत योजनामध्ये १२५३ घरकुले मंजूर असून आजपावेतो ९९२ घरकुले पूर्ण असून २६१ घरकुले बांधकाम प्रगतीत आहेत.

४४१ लाभार्थ्यांना दिली जागा

तालुक्यातील जागा नसलेल्या एकूण ४४१ लाभार्थीना पंडित दीनदयाळ उपाध्याय अर्थसाहाय्य योजना आणि नियमानुकूल करून जागा उपलब्ध करून त्यांना घरकुल मंजूर करण्यात आलेले आहेत. सर्व घरकुल योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना पंडित दीनदयाल योजना तसेच अतिक्रमण नियमानुकूल करून देऊन १०० टक्के मंजुरी तसेच घरकुल पूर्ण करण्यात मेहकर पंचायत समिती प्रथम आहे. यासाठी अभियान कालावधीत सर्व स्थापत्य अभियांत्रिकी सहायक तसेच ग्रामीण गृह अभियंता, यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, प्रकल्प संचालक चोपडे तसेच गटविकास अधिकारी आशिष पवार यांचे मार्गदर्शनात घरकुल लाभार्थींना भेटी देऊन त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून घरकुल पूर्ण करवून घेतले.