शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर : लोणी गवळी येथील कर्मचार्‍यांना मुख्यालयाची अँलर्जी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:24 IST

मेहकर: तालुक्यातील लोणीगवळी येथे येणारे विविध शासकीय कर्मचारी दररोज बाहेरगावावरून येणे-जाणे करतात. त्यामुळे कामावर परिणाम होत असून, याची चौकशी करून सदर कर्मचार्‍यावर कारवाई करावी, अन्यथा पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी किसान सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष माधवराव वानखेडेसह कार्यकर्त्यांनी  १९ डिसेंबर रोजी दिला आहे.

ठळक मुद्देकारवाई न झाल्यास पं.स. समोर उपोषण राष्ट्रवादी किसान सेलच्या जिल्हा उपाध्यक्षांचा इशारा!

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: तालुक्यातील लोणीगवळी येथे येणारे विविध शासकीय कर्मचारी दररोज बाहेरगावावरून येणे-जाणे करतात. त्यामुळे कामावर परिणाम होत असून, याची चौकशी करून सदर कर्मचार्‍यावर कारवाई करावी, अन्यथा पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी किसान सेनेचे जिल्हा  उपाध्यक्ष माधवराव वानखेडेसह कार्यकर्त्यांनी  १९ डिसेंबर रोजी दिला आहे.तालुक्यातील लोणीगवळी येथे विविध शासकीय कार्यालये आहेत. या ठिकाणी ग्रामसेवक, पशुवैद्यकीय अधिकारी, लाइनमन, तलाठी जि.प शाळेचे शिक्षक, कृषी सहायक यासह इतरही कर्मचारी दररोज बाहेरगावावरून येणे-जाणे करतात. सततच्या बाहेर गावावरून येण्या-जाण्यामुळे गावातील विविध विकासकामांवर याचा परिणाम होत आहे. तसेच गावातील अनेक विकासाची कामे खोळंबली आहेत. काही नागरिकांना या अधिकार्‍यांच्या मागे फिरावे लागते. सदर कर्मचार्‍यांनी मुख्यालयी राहावे, असे निर्देश असतानाही कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. अनेक कर्मचार्‍यांनी गावातून स्टॅम्प पेपरवर भाडेपट्टे करून घेतले आहेत. सदर भाडेपट्टय़ाची चौकशी करावी व संबंधित कर्मचार्‍यांना लोणी गवळी येथे मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, अन्यथा ३0 डिसेंबर रोजी पंचायत समिती मेहकरच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी किसान सेना जिल्हा उपाध्यक्ष माधव सखाराम वानखेडे, आरपीआय तालुका कार्याध्यक्ष देवीदास गोविंदराव खंडारे, भास्कर बाजीराव खंडारे, रमेश वानखेडे, भास्कर गवळी, राजेश नवले, सोपान कंकाळ, किसन इंगळे, दत्तात्रय जाधव, डॉ. श्रीराम मेहेत्रे, रामभाऊ कदम, वसंत खंडारे, दीपक गवळी आदींनी दिला आहे. 

रोहयोची कामे मजुरांना द्या!लोणी गवळीसह वरुड, आंधृड, भोसा, उमरा देशमुख या परिसरात रोजगार हमीची कामे ही मजुरांमार्फत होत नाहीत. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थितीत मजुरांवर उपासमारीची पाळी येते. रोजगार हमींची कामे मजुरामार्फतच करावी, असे शासनाचे निर्देश असतानाही या परिसरातील कामे जेसीबी मशीनच्या साहाय्याने करण्यात येतात. अनेक गरीब मजुरांकडून कागदपत्रे घेऊन कामाचे मस्टर भरून घेण्यात येते. यामुळे खर्‍या मजुरांना कामे मिळत नाहीत. त्यामुळे रोजगार हमीची कामे मजुरांमार्फतच करण्यात यावी, अशी मागणी आरपीआय मेहकरचे तालुका कार्याध्यक्ष, देवीदास गोविंद खंडारे, माधव वानखेडे, जगदीश अवचार आदींनी केली आहे.