शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर शहरात मुदतबाह्य पाकीटबंद पिठाची सर्रास विक्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:54 IST

मेहकर: परिसरात मुदतबाह्य पाकीटबंद गव्हाच्या पिठाची सर्रास विक्री होत असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक होत आहे.  याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे लोकमतने १९ डिसेंबर रोजी राबविलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आले.

ठळक मुद्देस्टिंग ऑपरेशन : ग्राहकांची फसवणूक : अन्न, औषध प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: परिसरात मुदतबाह्य पाकीटबंद गव्हाच्या पिठाची सर्रास विक्री होत असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक होत आहे.  याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे लोकमतने १९ डिसेंबर रोजी राबविलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आले.मेहकर शहरामध्ये बाहेरगावावरून शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी येत असतात, तसेच विविध कामानिमित्त अनेक गोरगरीब महिला- पुरुष येतात. सध्या महागाईचा काळ असल्याने अनेक गोरगरीब नागरिक तथा विद्यार्थी विविध किराणा दुकानावरून पाकीटबंद असलेले पीठ  विकत घेतात. बाजारातून अन्नधान्य घेऊन चक्कीवर नेऊन दळून घेणे, यामध्ये बराच वेळ जातो. त्यामुळे वेळ वाचावा यासाठी अनेक कुटुंबीय तसेच विद्यार्थी पाकीटबंद पीठ वापरतात. या पिठामुळे अनेकांचा वेळ वाचत असला तरी विविध किराणा दुकानांमध्ये विक्री होत असलेले पाकीटबंद असलेले पीठ मुदत संपल्यानंतरही विक्री होत असल्याचे स्टिंग ऑपरेशनदरम्यान उघडकीस आले. दरम्यान, काही दुकानदारानी पाकीटबंद पिठाची पाकिटावर नमूद मुदत संपल्यानंतर आम्ही कंपनीला पाकीट परत करीत असल्याचे यावेळी प्रतिनिधींना  सांगितले.  

ग्राहकांची फसवणूकमेहकर परिसरातीलकिराणा दुकानात अशा प्रकारचे मुदतबाह्य पाकीटबंद गव्हाच्या पिठाचे पाकीट विक्री होत आहे. अनेक किराणा दुकानात ५ किलो गव्हाचे पिठाचे पाकीट व्रिकीसाठी उपलब्ध होते. त्यापैकी काही दुकानात तीन महिन्याच्या आत पाकिटाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली; मात्र काही दुकानात तीन-तीन महिने पाकिटे विक्री होत नसल्यामुळे मुदत संपल्यानंतही अशा मुदतबाह्य पाकीटबंद गव्हाच्या पाकिटाची विक्री सुरूच असते. काही किराणा दुकानातून मोठे पाकीट फोडून पीठ विक्री होते. अशावेळी ग्राहक त्या पाकिटावरील मुदत पाहत नाही. अशा प्रकारे अनेक ग्राहकांची फसवणूक होत आहे.

असे राबविण्यात आले स्टिंग ऑपरेशनमुदतबाह्य पाकीटबंद गव्हाचे पीठ विक्री होत असल्याच्या माहितीवरून लोकमत टिममधील तीन सदस्यांनी सकाळी ११ वाजता शहरातील विविध किराणा दुकानात पाकीटबंद गव्हाच्या पीठाची चौकशी केली. यावेळी काही किराणा दुकानातील ५ किलो पिठाच्या पाकिटावर गव्हाचे पीठ पाकिटबंद करण्याची तारीख नमूद केलेली होती. यावेळी पाकिटावर सदर पीठ पाकीटबंद करण्याच्या तारखेपासून तीन महिने वापरण्यास योग्य असल्याचे नमूद असल्याचे दिसून आले; मात्र काही दुकानात पाकिटावरील नमूद तारखेनुसार तीन महिने उलटल्यानंतरही ते पाकीट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे वास्तव समोर आले. यावेळी टिममधील सदस्यांनी पाकिटाचे फोटो व पाकिटावर नमूद केलेली तारखचे फोटो घेतले. यावरून अनेक किराणा दुकानात मुदतबाह्य पाकीटबंद गव्हाचे पीठ विक्री होत असल्याचे उघडकीस आले.

मुदतबाह्य पाकीटबंद पिठाची विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. याबाबत माहिती दिल्यास संबंधित दुकानदारावर कारवाई करण्यात येईल.- गोपाल माहुरे, अन्न व औषध प्रशासन अधिकारी, बुलडाणा

टॅग्स :Mehkar Bypassमेहकर बायपासbuldhanaबुलडाणा