सुरुवातीला समिती प्रमुख आमदार संजय रायमुलकर यांचे विधिमंडळ सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर समितीतील सदस्यांचे स्वागत करून परिचय देण्यात आला.
या प्रारंभिक बैठकीत समितीप्रमुख आमदार संजय रायमुलकर यांनी ग्रामविकास विभागामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. या बैठकीला आमदार जयंत पाटील, किशोर पाटील (घाडगे), अनिल पाटील, दिलीप बनकर, शेखर निकम, सुभाष धोटे, डॉ.देवराव होळी, कृष्णा गजबे, किशोर जोरगेवार, अंबादास दानवे, विक्रम काळे, अमरनाथ राजूरकर, निरंजन डावखरे, किशोर आप्पा पाटील, किशोर दराडे, मेघना बोर्डीकर, प्रतिभा धानोरकर या सदस्यांची उपस्थिती होती. बैठकीला विधीमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत, संचालक लेखा व परीक्षण ग्रामविकास विभाग, उपसचिव श्रीमती तळेकर, अवर सचिव खैरे, कक्ष अधिकारी पिसाळ व तामोरे, समितीप्रमुख स्वीय सहायक रूपेश गणात्रा, राम भांडेकर, विनोद कोल्हे यांसह विधानमंडळाचे व ग्रामविकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.