शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कोवीड सेंटरमधील वैद्यकीय कचरा रस्त्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 10:50 IST

आठ जुलै रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे हा संपूर्ण कचरा रस्त्यावर व इंदिरा नगरच्या भागात गेला.

बुलडाणा : येथील धाड मार्गावरील कोवीड केअर सेंटरमध्ये मधील वैद्यकीय कचरा हा थेट इंदिरानगर परिसर आणि लगतच्या रस्त्यावर आल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती.यापूर्वीही सहा मे रोजी येथील कोवीड केअर सेंटरमधील पीपीई कीट व कचरा रस्त्यावर जाळण्यात आल्याचा प्रकार उघड झाला होता. त्यानंतर जवळपास दोन महिन्यानंतर पुन्हा हा प्रकार समोर आला. येथील कोवीड केअर सेंटरच्या बाजूला एक खड्डा खोदून त्यात येथील वैद्यकीय कचरा टाकण्यात येतो. मात्र पालिकेने हा कचरा उचलला नसल्याने तो तेथे तसाच पडून होता.दरम्यान आठ जुलै रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे हा संपूर्ण कचरा रस्त्यावर व इंदिरा नगरच्या भागात गेला. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. वास्तविक केंद्रीय वन, पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने २८ मार्च २०१६ रोजी जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन अधिनियम लागू केला आहे. त्या कायद्यानुसार जैव वैद्यकीय कचऱ्याची सास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. मात्र अलिकडील काळात त्याला खो बसत आहे. रस्त्यावर तथा नागरी वस्तीच्या परिसरात गेलेला कचरा हा वैद्यकीय कचरा नसून जनरल प्लास्टीक आहे. त्यात पीपीई कीट नाहीत. नागरिकांना या या पासून कुठलाही धोका नाही. हा कचरा पालिकेने नेला नसल्याने तेथे खड्डा खोदण्यात येऊन तो टाकण्यात आला होता.- डॉ. पी. बी. पंडीतजिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या