शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

अकोल्यातील वैद्यकीय पथकाकडून सातपुड्यातील आदिवासींची वैद्यकीय सेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 13:40 IST

खामगाव:   सातपुड्याच्या पर्वत रांगेतील आदिवासी-वनवासी गावं आणि पाड्यातील अडीच हजार आदिवासींना अकोल्यातील वैद्यकीय पथकांकडून वैद्यकीय आणि औषधोपचार सेवा पुरविण्यात आली.

ठळक मुद्देअडीच हजारावर आदिवासींची मोफत वैद्यकीय तपासणी तसेच १२६५ आदिवासी-वनवासी बांधवांना मोफत औषधीचे वितरण करण्यात आले. अकोला येथील शुभमं करोती फांऊडेशनच्यावतीने या शिबिरासाठी सुमारे अडीच लाख रुपयांचा खर्च करण्यात आला.अकोला येथील शुभम करोती फांऊडेशनच्यावतीने ४१ तज्ज्ञ डॉक्टरांनी सालईबनात आदिवासी-वनवासींना सेवा दिली.

खामगाव:   सातपुड्याच्या पर्वत रांगेतील आदिवासी-वनवासी गावं आणि पाड्यातील अडीच हजार आदिवासींना अकोल्यातील वैद्यकीय पथकांकडून वैद्यकीय आणि औषधोपचार सेवा पुरविण्यात आली. यावेळी अडीच हजारावर आदिवासींची मोफत वैद्यकीय तपासणी तसेच १२६५ आदिवासी-वनवासी बांधवांना मोफत औषधीचे वितरण करण्यात आले. अकोला येथील शुभमं करोती फांऊडेशनच्यावतीने या शिबिरासाठी सुमारे अडीच लाख रुपयांचा खर्च करण्यात आला.

महात्मा गांधी लोकसेवा संघ, सालईबन परिवार आणि तरुणाई फांऊडेशनच्यावतीने सातपुड्याच्या पर्वतरांगेतील वडपाणी, बांडापिंपळ, चालठाणा, भिंगारा, गोमाल, चाळीस टापरी, गोरक्षनाथ, उमापूर, इस्लामपूर, चारबन, मेंढाचारी, कुंवरदेव, आमपाणी, सोनबर्डी, वसाडी, हड्यामाल, अंबाबरवा या जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी-वनवासी गावांतील आदिवासींसोबतच मध्यप्रदेशातील बादलखोरा, चिल्लारा, आमलापाणी, करोली, जैसोंकी येथील सुमारे अडीच हजार आदिवासींची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. सातपुड्याच्या पर्वंत रांगेतील हे सर्वात मोठे शिबिर रविवारी जळगाव जामोद तालुक्यातील सालईबन येथे पार पडले. सकाळी ९ वाजतापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत अकोला येथील डॉ. सदानंद भुसारी, डॉ. वैशाली डोसे, डॉ. वैशाली राठोड, डॉ. प्रवीण इंगळे, डॉ. योगेश पाटील, डॉ. ममता ठाकरे, डॉ. भारती मुठाळ,  डॉ. धनश्री शिंदे, डॉ. पल्लवी रायबोले, डॉ. योगेश साहू, डॉ. श्रीपाद उजवणे, डॉ. स्वप्नील गावंडे, डॉ. अमित अग्रवाल, डॉ. सुनिल बिहाडे, डॉ. संजय पाटील, डॉ. विवेक खपली, डॉ. समीर देशमुख, डॉ. कुशल कवडे, पुष्पा रामागडे, संतोष खडसने, समाधान किरतकार, राहुल पोफडे,  सदानंद शेगोकार, अनिल सूर्यवंशी, सचिन भालेराव, रवी सोनोने, वैभव पांडे, सुजित सरकटे, अमोल कुलट, सुशील इंगळे, कपिल मोरखडे, किशोर रत्नपारखी यांनी रुग्णतपासणी तसेच औषधोपचार सेवा दिली. आरोग्य शिबिर  यशस्वी करण्यासाठी मनजीतसिंह शीख,नारायण पिठोरे,  अविनाश सोनटक्के, सचिन ठाकरे, उमाकांत कांडेकर, अमोल तायडे, ग्यानसिंग खरत, तेजस छल्लाणी, विठ्ठल पवार, राजेंद्र कोल्हे यांच्यासह तरुणाई आणि सालईबन परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले.

 

४१ तज्ज्ञ डॉक्टरांकडून सेवा!

अकोला येथील शुभम करोती फांऊडेशनच्यावतीने ४१ तज्ज्ञ डॉक्टरांनी सालईबनात आदिवासी-वनवासींना सेवा दिली. यावेळी फिजीओथेरपी, होमिओपॅथी, आयुर्वेदीक तज्ज्ञांनीही उपस्थिती दर्शविली होती. तसेच आयसीयु तज्ज्ञांचीही उपस्थिती हे या शिबिराचे खास वैशिष्टे ठरले. यावेळी १२६५ आदिवासी-वनवासी बांधवांना लक्षावधी रुपयांच्या औषधीचे मोफत वितरण करण्यात आले. सातपुड्याच्या पर्वत रांगेतील हे सर्वात मोठे आरोग्य शिबिर ठरले.

अकोला येथील वैद्यकीय पथकाकडून सालईबन येथे आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी आदिवासींना मोफत औषधीही वितरीत करण्यात आली. यासाठी डॉक्टरांचे पथक, रुग्णवाहिका आणि अद्ययावत डिस्पेसरी व्हॅन सालईबनात उपलब्ध करण्यात आल्या होत्या. या आरोग्य शिबिराचा आदिवासी-वनवासी बांधवांना मोठा लाभ झाला.

- जगदीश खरत,सदस्य, सालईबन परिवार, चालठाणा(शांतीनगर)

टॅग्स :buldhanaबुलडाणाAkolaअकोलाdoctorडॉक्टर