शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मतदान केंद्रावर वैद्यकीय सुविधाही द्याव्या लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 16:46 IST

  बुलडाणा: लोकसभा निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज असून मतदान केंद्रावर वैद्यकिय सहाय्यकही देण्याबाबत आयोगाने सुचीत केले आहे.

 बुलडाणा: लोकसभा निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज असून मतदान केंद्रावर वैद्यकिय सहाय्यकही देण्याबाबत आयोगाने सुचीत केले आहे. दरम्यान, पिण्याच्या पाण्यासह मतदानाच्या दिवशी वीज पुरवटा खंडीत होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. सोबतच दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअरचीही सुविधा उपलब्ध करण्यात यावी, अशा महत्त्वाच्या सुचना अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी २२ मार्च रोजी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लोकसभा निवडणूक २०१९ च्या तयारीचा आढावा एका बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस.,  उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गौरी सावंत, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.निवडणुकींच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावीत, असे ही विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले. निवडणूकीच्या अनुषंगाने व्हीव्हीपॅटचे प्रात्याक्षिक तथा प्रशिक्षणही गांभिर्यपूर्वक दिल्या जावे, असे ही त्यांनी स्पष्ट केले. मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीनेही मतदान जागृती कार्यक्रम सुरू ठेवावे. यावेळेस निवडणूक आयोगाने मतदार चिठ्ठी ही मतदार ओळखपत्र गृहीत धरण्यात येवू नये, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मतदानावेळी मतदारांनी मतदार चिठ्ठी ओळखीचा पुरवा म्हणून आणू नये. प्रत्येक मतदाराने निवडणूक ओळखपत्र सोबत ठेवावे. मतदान केंद्रावर संदेश वहन व्यवस्था अगदी चोख ठेवावी. मतदानाची नियमित टक्केवारीची माहिती पाठवावी. मतदान केंद्रामध्ये व्हिव्हिपॅट मशीनवर कुठल्याही प्रकारे उष्णता वाढविणारे साधन ठेवू नये. विजेचा बल्बही मशीनवर येणार नाही, याबाबत काळजी घ्यावी.

मतदानावेळी पुरावा म्हणून ही ओळखपत्रे चालतीलमतदार चिठ्ठी ही ओळखीचा पुरावा म्हणून चालणार नाही. प्रत्येक मतदाराने निवडणूक ओळखपत्र सोबत आणावे. ते नसल्यास त्याऐवजी पासपोर्ट, वाहन चालक परवाना, राज्य/केंद्र/पीएसयु/पब्लीक लिमिटेड कंपन्यांद्वारे कर्मचार्यांना जारी केलेल्या फोटोसह ओळखपत्र, बँक व पोस्ट आॅफीसद्वारे जाही केले फोटो ओळखपत्र, पॅन कार्ड, एनपीआरद्वारे जारी केलेले स्मार्टकार्ड, मनरेगाचे जॉब कार्ड, श्रम मंत्रालयाच्या योजनेतंर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले पेन्शन दस्तऐवज, सांसद सदस्य/ विधान सभा किंवा विधान परिषद सदस्य  यांना जारी केलेले अधिकृत ओळखपत्र व आधार कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून मतदानासाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याचेही यावेळी विभागीय आयुक्तांनी आढावा बैठकीत स्पष्ट केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक