शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव नगरपालिकेतील मोजमाप पुस्तिका सापडेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 11:32 IST

Khamgaon municipal counsil : सर्वत्र शोध घेऊनही  ही मोजमाप पुस्तिका सापडत नसल्याने बांधकाम विभागातील अधिकारी-कर्मचारी हतबल झाले.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : सिमेंटरस्त्याची अनामत रक्कम काढण्यासाठी खोटे दस्तवेज तयार करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच, बांधकाम विभागातील मोजमाप पुस्तिका गहाळ झाली आहे. त्यामुळे पालिकेच्या बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली आहे.  सर्वत्र शोध घेऊनही  ही मोजमाप पुस्तिका सापडत नसल्याने बांधकाम विभागातील अधिकारी-कर्मचारी हतबल झाले असून, एकाच महिन्यात बांधकाम विभागातील दोन वेगवेगळी प्रकरणे समोर आल्याने मुख्याधिकारी चांगलेच संतप्त झाले आहेत.खामगाव नगर पालिका हद्दीतील प्रभाग ११ मधील तरण तारण नगरातील नागरी दलित वस्ती सुधार योजनेतंर्गत सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. अतिशय निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची अनामत रक्कम काढण्यासाठी कंत्राटदाराने नगर पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाºयांना हाताशी धरून खोटे दस्तवेज तयार केले. उल्लेखनिय म्हणजे अंतर्गत लेखा परिक्षकांनी जाणीवपूर्वक ठेवलेल्या ‘गोमी’वर लेखा विभागाने ‘टाच’ लावली. त्यामुळे प्रकरण वरिष्ठांपर्यंत पोहोचले.  त्यानंतर आता बांधकाम विभागातील मोजमाप पुस्तिका क्रमांक ६ गहाळ झाली आहे. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतरही ही पुस्तिका सापडत नसल्याने पालिकेच्या बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली असून, एकाच महिन्यात दोन प्रकरणं समोर आल्याने, मुख्याधिकारी चांगलेच संतप्त झाले आहेत. याप्रकरणी अधिक माहितीसाठी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, त्यांनी कानावर हात ठेवत, अधिक माहिती देण्याचे टाळले. 

एकाच विकास कामाचा दोन हेडखाली समावेश...स्थानिक नगर पालिकेच्या बांधकाम विभागातील अनागोंदी कारभाराने कळस गाठला आहे. बांधकाम विभागातील फाईल गहाळ, खोटे दस्तवेज तयार करणे, मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्यानंतर आता एकाच विकास कामाचा दोन वेगवेगळ्या निधीतून समावेश करण्यात आला. साडेचार लक्ष रूपयांच्या विकास कामाचा नगर परिषद निधी आणि रस्ता निधीतंर्गत समावेश करीत खामगाव पालिकेने ई-निविदाही प्रकाशित केली. त्यामुळे खामगाव पालिकेतील बांधकाम विभागात नेमके सुरू तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एकासाठी खटाटोप; दुसऱ्याकडे दुर्लक्ष!n कंत्राटदाराशी संगनम करून अनामत रक्कम काढण्यासाठी खोटे दस्तवेज तयार करण्यात आले.  अर्थपूर्ण व्यवहारातून कंत्राटदाराला मदत करण्यात आली. त्याचवेळी नियमानुसार काम पूर्णत्वास गेल्यानंतरही गत दहा वर्षांपासून दुसऱ्या एका कंत्राटदाराला अनामत रक्कम देण्यासाठी पालिकेकडून चालढकल केली जात आहे. n ही धक्कादायक वस्तुस्थिती गत महिन्यात घडलेल्या दोन वेगवगळ्या प्रकरणावरून दिसून येते. अनामत रक्कम काढण्यासाठी एका मदत तर दुसऱ्याला त्रास अशी दुहेरी भूमिका पालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकारी घेत असल्याची चर्चा पालिका वर्तुळात होत आहे.

शहरातील विकास कामांसंदर्भात खामगाव पालिकेने ई-निविदा प्रकाशित केली आहे. यामध्ये एका विकास कामाचा दोनवेळा चुकीने समावेश झाला आहे. बांधकाम विभागाकडून यासंदर्भात शुध्दीपत्रक दिले जाईल.-डी.टी. थोरवेकार्यालयीन पर्यवेक्षक, नगर परिषद, खामगाव. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव