शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

चिखलीत उद्या भव्य रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:40 IST

‘लोकमत-रक्ताचं नातं’ या राज्यव्यापी मोहिमेंतर्गत राज्यभरात रक्तदान शिबिर पार पडत आहे. यासाठी सर्व चिखलीकरांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. भाजप, ...

‘लोकमत-रक्ताचं नातं’ या राज्यव्यापी मोहिमेंतर्गत राज्यभरात रक्तदान शिबिर पार पडत आहे. यासाठी सर्व चिखलीकरांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, वंचित बहुजन आघाडी, भारिप बमंस, रिपाइं, बसपा आदी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारींपासून सर्वसामान्य कार्यकर्ते या शिबिरासाठी सरसावले आहेत. सोबतच विविध सामाजिक, सहकार, शैक्षणिक, धार्मिक संस्था, मंडळे, संस्थाने, महाविद्यालये यांनीदेखील यामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी होत शिबिराच्या यशस्वितेसाठी पुढाकार घेतला आहे. या पृष्ठभूमीवर शहरात सर्वत्र बॅनर लावून व सोशल मीडियाव्दारे जनजागृती केली जात असून चिखलीकरांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता या शिबिरात विक्रमी रक्तदान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पृष्ठभूमीवर शिबिरस्थळी जय्यत तयारी करण्यात आली आहे. अनेक रक्तदाते स्वयंस्फूर्तीने पुढे आले असून आम्हीदेखील रक्तदान करणार असल्याचे ठामपणे सांगत आहेत.

रक्तदानासाठी यांचे आवाहन

चिखली येथील महायज्ञात रक्तदानासाठी राज्याचे अन्न व औषधी प्रशासनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे, खा. प्रतापराव जाधव, आ. श्वेता महाले, माजी आ. राहुल बोंद्रे, नगराध्यक्षा प्रिया कुणाल बोंद्रे, उपनगराध्यक्षा वजीराबी शे.अनिस, तहसीलदार डॉ. अजितकुमार येळे, ठाणेदार गुलाबराव वाघ, चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीश गुप्त, अंबिका अर्बनचे अध्यक्ष अ‍ॅड. विजय कोठारी, महाराष्ट्र शिक्षक आघाडीचे संस्थापक प्राचार्य डॉ. निलेश गावंडे, माजी नगराध्यक्ष सलीम मेमन, स्व. सेठ ब्रिजमोहन लढ्ढा फाउंडेशनचे आशिष लढ्ढा, मुंगसाजी महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक देशमाने, श्रीराम नागरीचे अध्यक्ष पंडितराव देशमुख, न.प.गटनेते मो.आसीफ, नगरसेवक रफीक कुरेश, प्रा.डॉ.राजू गवई, दीपक खरात, नामू गुरूदासाणी, विजय नकवाल, दत्ता सुसर, गोपाल देव्हडे, गोविंद देव्हडे, राजू रज्जाक, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ.म.इसरार, शिवसेना तालुकाप्रमुख कपिल खेडेकर, शिवराज पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, नितीन राजपूत, तसेच गजू तारू, अमित वाधवाणी, सचिन शेटे, बाळू भिसे, संजय अतार, अनिल वाकोडे, तुषार बोंद्रे, रवींद्र तोडकर, शेखर बोंद्रे, शे. इम्रान, जका ठेकेदार, नजीर कुरेशी, अनवर कुरेशी, अन्सार कुरेशी, चेतन देशमुख, सागर पुरोहित, साबीर शेख, शहेजाद शेख, भारत जोगदंडे, परवेज जमदार, तन्जीम हुसेन, समीर शेख, शोएब शहा, अजीम शेख, अकरम मेमन, अब्दुल मोहीन, सर्वपक्षीय पदाधिकारी, विघ्नहर्ता गणेश मंडळ, संत गजानन महाराज भक्त मंडळ, तुळजाभवानी गणेश मंडळ, श्री शिवबा गणेश मंडळ, भाईजान ग्रुप, सुप्रभात ग्रुप, गुड मॉर्निंग ग्रुप, केजीएन ग्रुप, ब्लड डोनर ग्रुप चिखली, पोलीस पाटील संघटना, सरपंच संघटना, लब्बैएक ग्रुप अमडापूरसह विविध संस्था, संघटना, पतसंस्था आदी सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांकडून रक्तदानाचे आवाहन करण्यात येत आहे.

शासकीय सेवेतील मान्यवरांचाही पुढाकार

शासकीय सेवेत विविध पदांवर कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्यासह ग्रामसेवक संघटना, कृषी सहायक संघटना, तलाठी संघटना, पशुचिकित्सा व्यवसायी संघटना, पोलीस कर्मचारी आदीदेखील या शिबिरासाठी पुढाकार घेत आहेत.

मनसे देणार रक्तदात्यांना वृक्षांची भेट

कोरोनाकाळात ज्याप्रमाणे रक्ताचा तुटवडा जाणवला, त्याचप्रमाणे ‘ऑक्सिजन’चेही महत्त्व अधोरेखित झाले. यापृष्ठभूमीवर या शिबिरात रक्तदानाचे महान कार्य करणाऱ्या दात्यांना वृक्षरोप भेट स्वरूपात देण्याचा कौतुकास्पद निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला असून, शिबिरात रक्तदान करणाऱ्या दात्यांना विविध वृक्षरोपे भेट देणार असल्याची माहिती मनसेचे शैलेश गोंधणे व पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.