शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मस, उतावळी प्रकल्प १00 टक्के भरले!

By admin | Updated: August 28, 2016 23:16 IST

बुलडाणा जिल्ह्यातील मोठय़ा प्रकल्पांना दमदार पावसाची प्रतीक्षा.

बुलडाणा,दि. २८: पावसाळा सुरू होवून अर्धा कालावधी लोटल्यानंतर जिल्ह्याचा काही भागात अद्या पही दमदार पाऊस न पडल्यामुळे भविष्यातील पाणी टंचाईचे संकट कायम आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील मस व उतावळी प्रकल्प १00 टक्के भरले असून इतर प्रकल्पांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.जिल्ह्यात दरवर्षी सिंचन व पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर असतो. सिंचनामुळे अनेक शेतकर्‍यांना जमिनी चांगल्या असल्यातरी पाणी देता येत नाही. तर पाणीटंचाईमुळे अनेक गावे उन्हाळ्यात होरपळतात. त्यामुळे दरवर्षी पिण्याचा पाण्यासाठी करोडो रूपये खर्च करावे लागतात. शेवटी निसर्गावर अवलंबून रहावे लागते. यावर्षी मागिल वर्षापेक्षा दुप्पट पाऊस असला तरी भविष्यात पाणीटंचाईचे संकट पाहता दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. जिल्ह्यातील घाटाखालील भागात दमदार पाऊस झाल्यामुळे काही धरणे, प्रकल्प भरली आहेत. त्यात मस, उतावळी धरणाचा समावेश आहे. मात्र घाटावरील परिसरातील प्रकल्पांना अजूनही दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. सध्यास्थितीत जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात १९.१0, पेनटाकळी २६.१६ व खडकपूर्णा प्रकल्पात ३४.६७ टक्के जलसाठा आहे. मध्यम प्रकल्पातील पलढग प्रकल्पात ४८.0७, ज्ञानगंगा ४३, मस १00, कोराडी ८१.३५, मन ६४.३८, तोरणा ३७.९0, व उतावळी प्रकल्पात १00 टक्के जलसाठा आहे. तसेच जिल्ह्यात ७४ लघुप्रकल्पात कमी-जास्त प्रमाणात जलसाठा असून दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.मूग बाजारात आल्यानंतर भाव घसरलेसध्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांची कसरत सुरू आहे. एका बाजूला शेतकरी निसर्गाशी दोन हात करीत असून दुसर्‍या बाजूला व्यापार्‍यांशी मुकाबला करीत आहे. यापूर्वी मुगाला ८ हजारापर्यंंंंत भाव होता. त्यावेळी शासनाने मुगाचा हमी भाग ५ हजार २00 जाहीर केला होता. मात्र शेतकर्‍यांजवळ मुग नव्हता. त्यामुळे शासनाने मुग आयात केला. त्यामुळे मुगाचे भाव गडगडले. आता शेतकर्‍यांचा मुग घरी येत आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍याच्या मुगाला ४ ते ४ हजार ५00 भाव देण्यात येत आहे. त्यामुळे शे तकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शासनाने हमी भावात वाढ करून शेतकर्‍यांसाठी खरेदी केंद्र सुरू करण्याची गरज आहे.