शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती विकासासाठी निधी देऊ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 19:44 IST

बुलडाणा : नवीन कार्यकारीणीने बुलडाणा बाजार समितीमध्ये केलेले बदल आदर्श असून बाजार समितीच्या विकासासाठी निधी देण्यास आपले प्राधान्य राहील, असे आश्वासन कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले.

ठळक मुद्देकृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे आश्वासन नवीन कार्यकारीणीने बुलडाणा बाजार समितीमध्ये केले आदर्श बदल 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : नवीन कार्यकारीणीने बुलडाणा बाजार समितीमध्ये केलेले बदल आदर्श असून बाजार समितीच्या विकासासाठी निधी देण्यास आपले प्राधान्य राहील, असे आश्वासन कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले.बुलडाणा बाजार समितीची त्यांनी शुक्रवारी पाहणी केली. सोबतच विविध विकास कामांची माहिती जाणून घेतली. प्रारंभी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा बाजार समितीचे सभापती जालिंदर बुधवत यांनी त्यांचा शाळ, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे, बाजार समिती उपसभापती गौतम बेगानी, संचालक नारायण सुसर, भाजप तालुकाध्यक्ष मोहन पवार, युवासेनेचे जिल्हा समन्वयक राजू मुळे प्रामुख्याने उपस्थित होते.दरम्यान, कृषीमंत्री फुंडकर यांनी बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीचा कायापालट, कृषीमाल ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या ३० हजार मेट्रीक टन क्षमतेच्या गोडावूनची व्यवस्था, पिण्याचे पाणी तथा शौचालय व्यवस्था आणि हमाल-मापार्यांसाठीच्या विमा योजनेचे कौतूक केले. शेतकर्यांच्या हिताच्या दृष्टीने कार्य करणाºया बाजार समितीला विकास निधी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी माजी पंचायत समिती सभापती सुधाकर आघाव, बाजार समितीच्या सचिव वनिता साबळे, सहसचिव गोविंद दळवी, सुनील काळवाघे, दीपक चव्हाण, पी. जे. गारवे, गजानन व्यवहारे, जितेंद्र गवई, संतोष सनई, सिद्धराज पंधाडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :Pandurang Phundkarपांडुरंग फुंडकर