शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
3
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
4
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
5
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
6
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
7
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
8
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
9
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
10
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
11
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
12
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
13
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
14
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
15
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
16
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
17
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
18
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
19
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
20
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!

बाजार समितीच्या निवडणुकीत ८0 उमेदवार

By admin | Updated: May 7, 2015 01:15 IST

चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.

चिखली : तालुक्यातील राजकीय व सहकार क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र चिखली कृषिउत्पन्न बाजार समितीवर ह्यकमांडह्ण मिळविण्यासाठी दिग्गज नेते व 'भाऊ'मंडळी सरसावले आहेत. संचालकांच्या १८ जागांसाठी होणार्‍या निवडणुकीत दिग्गजांच्या तीन पॅनेलसह इतर असे एकूण ८0 उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. या निवडणुकीमध्ये आमदार राहुल बोंद्रे व माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वा तील बळीराजा पॅनेल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. नरेंद्र खेडेकर व शिवसेना यांनी हातमिळवणी करीत उभे केलेले शिवराणा परिवर्तन पॅनेल, तर भाजप आणि शे तकरी संघटना स्वतंत्र पॅनेलच्या माध्यमातून या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. बाजार समितीच्या १८ जागांसाठी तब्बल ५७५ उमेदवारी अर्जांची विक्री झाली, तर १५ एप्रिल रोजी शेवटच्या दिवशी तब्बल ३६५ एवढे विक्रमी अर्ज दाखल झाले हो ते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, ५ मे रोजी यातील २0४ अर्ज मागे घेण्या त आले होते. दरम्यान, ६ मे रोजी निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची अंतिम यादी चिन्हांसह जाहीर करण्यात आली असून, यानुसार ८0 उमेदवार या निवडणुकीत आ पले नशीब अजमावणार आहेत. *अर्ज चिखलीचा, शिक्का जळगाव जामोदचाबाजार समितीच्या निवडणुकीसाठी साहाय्यक निबंधक (प्रशासन) उमेशचंद्र प्र. हुशे यांची यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राजकीय व सहकारदृष्ट्या महत्त्व राखणार्‍या या निवडणुकीला मात्र निवडणूक निर्णय हुशे हे फारसे गांभीर्याने घेत नसल्याची बाब उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्यांना मिळालेल्या पोचपावतीवरून दिसून आले. उमेशचंद्र हुशे यांनी उमेदवारी मागे घे तलेल्या उमेदवारांना पोचपावतीवर चिखली ऐवजी चक्क जळगाव जामोद कृषिउत्पन्न बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी असा उल्लेख असलेला शिक्का मारला आहे. ही बाब ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले व ५ मे रोजी आपला अर्ज मागे घेतलेले उमेदवार परमानंद अंबादास लहाने यांना मिळालेल्या पोचपावतीवरून सिद्ध झाले आहे.