शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maratha Kranti Morcha : जळगावात रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 16:39 IST

जळगाव जामोद :  सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्यावतीने जळगावमध्ये आज २४ जुलै रोजी मराठा तरूणांनी रास्ता रोको केला.

ठळक मुद्देदोन एसटी बसच्या काचा फोडल्या तर शहरातील शाळा कॉन्व्हेंट आणि कॉलेजेस बंद ठेवण्यात आली. याबाबत नियोजन करून उद्या जळगावात बंद ठेवण्यात येईल असे मराठा समाजाच्यावतीने सांगण्यात आले. ४८ जणांना पोलिसांनी सकाळी १०.३० वाजताचे दरम्यान ताब्यात घेतले व दुपारी ३ वा. सोडण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद :  सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्यावतीने जळगावमध्ये आज २४ जुलै रोजी मराठा तरूणांनी रास्ता रोको केला. यावेळी मुक्ताईनगर आणि जळगाव जामोद आगाराच्या दोन एसटी बसच्या काचा फोडल्या तर शहरातील शाळा कॉन्व्हेंट आणि कॉलेजेस बंद ठेवण्यात आली. तर दुकाने व बाजारपेठ बंद केल्यानंतर व्यापारी संघटनेच्या आवाहनाने पुन्हा उघडण्यात आली. तर याबाबत नियोजन करून उद्या जळगावात बंद ठेवण्यात येईल असे मराठा समाजाच्यावतीने सांगण्यात आले. यावेळी पिंपळगाव काळे, आसलगाव आणि जळगाव येथून ४८ कार्यकर्त्यांना अटक करून दुपारी त्यांची सुटका करण्यात आली. यावेळी पराग अवचार, गजानन अवचार, जितेंद्र देशमुख, गणेश गावंडे, भिमराव पाटील, प्रकाश गावंडे, दिपक देशमुख, शिवा गावंडे, रूस्तम दाभाडे, अमोल दाभाडे, प्रशांत गावंडे, गौरव पाटील, दिलीप देशमुख, संदीप पाटील, अक्षय भालतडक, गजानन दाभाडे, सर्जेराव दाभाडे, गजानन भालतडक, अमोल क्षीरसागर, अनंता सारोकार, गोपाल बावस्कार, विठ्ठल बावस्कर यांच्यासह ४८ जणांना पोलिसांनी सकाळी १०.३० वाजताचे दरम्यान ताब्यात घेतले व दुपारी ३ वा. सोडण्यात आले. त्यांच्यावर कलम ६८, ६९ अन्वये कारवाई करण्यात आली. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष प्रकाश पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता पाटील, पणन महासंघाचे उपाध्यक्ष प्रसेनजित पाटील, राकाँचे जिल्हा कार्याध्यक्ष संगीतराव भोंगळ, यांनी कार्यकर्त्यांना भेट दिली. तर नुकसानग्रस्त एसटी क्रमांक एमएच१४-बीटी ०१०७ मुक्ताईनगर आगार आणि दुसरी क्षतीग्रस्त एसटी बस क्र. एमएच १४-बीटी ४५३० जळगाव जामोद आगारच्या दोन्ही चालकांनी जळगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार सार्वजनिक संपत्तीचे नुकसान म्हणून भादंविचे कलम ३४१, ४२७, १८६, ३३६, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय सरदार हे करीत आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा