शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

अनेक प्रकल्पग्रस्त लाभापासून वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:17 IST

मलकापूर: राष्ट्रीय महामार्ग ६ च्या चौपदरीकरणाची सुरुवात झाली आहे. त्यात प्रकल्पग्रस्तांना लाभ देण्यात आले आहेत; मात्र उर्वरित तथा सुटलेल्या प्रकल्पग्रस्तांना लाभ देण्याविषयीची अधिसूचना प्रकाशित झाली असताना प्रत्यक्षात लाभ नाही. अर्थात त्यादृष्टीने प्रशासनाच्या हालचाली सुरू असल्या तरी सहा महिने कालावधी लोटल्याने दिवाळी गेली आता संक्रांतीची वाट बघायची का, असा नाराजीचा सूर लाभार्थीत उमटत आहे.

ठळक मुद्देदिवाळी गेली, आता संक्रांतची वाट बघायची का? लाभार्थींचा सवाल

हनुमान जगताप। लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: राष्ट्रीय महामार्ग ६ च्या चौपदरीकरणाची सुरुवात झाली आहे. त्यात प्रकल्पग्रस्तांना लाभ देण्यात आले आहेत; मात्र उर्वरित तथा सुटलेल्या प्रकल्पग्रस्तांना लाभ देण्याविषयीची अधिसूचना प्रकाशित झाली असताना प्रत्यक्षात लाभ नाही. अर्थात त्यादृष्टीने प्रशासनाच्या हालचाली सुरू असल्या तरी सहा महिने कालावधी लोटल्याने दिवाळी गेली आता संक्रांतीची वाट बघायची का, असा नाराजीचा सूर लाभार्थीत उमटत आहे.यासंदर्भात अधिक माहिती अशी गेल्या अनेक वर्षे, राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी मलकापूर व नांदुरा या तालुक्यातील शेतकरी व व्यावसायिकांच्या जमिनी शासनाच्या वतीने संपादित करण्यात आल्या आहेत. दराच्या मुद्यावरून चांगलाच गदारोळ माजला होता. शेवटी लाभार्थींना रेडिरेकनरच्या दरानुसार लाभ देण्यात आला आहे.त्यात उर्वरित राहिलेल्या जमिनी धारकांना तथा सुटलेल्यांना मोबदला देण्याविषयीची अधिसूचना, राष्ट्रीय महामार्ग अधिनियम १९५४ चे कलम ३ (जि) ३ नुसार ३0 मे २0१७ रोजी प्रकाशित करण्यात आली आहे. त्यासाठी र्मयादित कालावधी शासनाच्या वतीने निर्धारित केला असता तरी दुसरीकडे प्रत्यक्ष कामाची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे लाभाविषयी असंख्य प्रकल्पग्रस्तात साशंकता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी अनेकांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. लाभही देण्यात आला आहे; मात्र उर्वरित तथा सुटलेल्या लाभार्थींसाठी अधिसूचना प्रकाशित होऊन सहा महिन्याचा कालावधी लोटला असताना प्रत्यक्षात काम नाही. अशात दिवाळी गेली आता काय संक्रांतीची वाट बघायची का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होताना दिसत आहे.  यासंबंधी माहिती घेतली असता प्रशासनिक स्तरावर  अवार्ड अंतरिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे; मात्र दुसरीकडे चौपदरीकरणाची सुरुवात झाल्याने प्रकल्पग्रस्तांच्या चिंता वाढल्या आहेत. 

सावळा गोंधळचौपदरीकरणादरम्यान प्रकल्पग्रस्तांना लाभ देण्यात आला. त्यात चांगलाच घोळ निर्माण झाला असल्याची माहिती आहे. गट नं.१३२ मध्ये ज्यांच्या नावे जमीन महामार्गात गेली ते लाभापासून वंचित तर ज्यांची जमीन न जाता त्यांना लाभ मिळाल्याची अनेक उदाहरणे समोर येऊ लागली आहेत. त्याची चौकशी सुरू आहे; मात्र हा प्रकार लाखो रुपयांचा असल्याने त्याची चर्चा आहे. 

प्रकल्पग्रस्तांसाठी शासनाने अधिसूचना जारी केली. त्यात एक वर्षाचा अवधी आहे. त्याच दृष्टीने जमिनीचे मोजमाप घेऊन पारदर्शकतेने लाभार्थींना न्याय व लाभ मिळावा, असे आमचे प्रयत्न आहेत. येत्या डिसेंबरच्या उत्तरार्धात प्रकरणे निकाली लागतील.- सुनील विंचनकर,भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, मलकापूर.

अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर प्रकल्पग्रस्तांना लाभ हा तत्काळ मिळायला हवा. त्यास विलंब होत असल्याने आमच्या मनात साशंकता निर्माण होणे साहजिकच आहे. आधीच जमिनीच्या मोबदल्यात कमी पैसा मिळाला आहे. आता तरी योग्य न्याय मिळावा व लाभ त्वरित मिळावा, ही अपेक्षा आहे.- प्रसादराव जाधव,प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी