शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी केले निर्माल्याचे व्यवस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:11 IST

जळगाव जामोद : सातपुड्याच्या  पायथ्याशी  असलेल्या गोराडा धरणावर विसर्जनासाठी आलेल्या  गणरायांचे निर्माल्य गोळा करून पर्यावरण मित्रांनी  धरणाच्या स्वच्छतेबाबत निर्माल्याचे पावित्र्यही जपले.

ठळक मुद्देपर्यावरण ग्रुपचा स्तुत्य उपक्रमगोराडा धरणावर विसर्जनासाठी आलेल्या गणरायांचे  निर्माल्य गोळा केले 

जयदेव वानखडे। लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : सातपुड्याच्या  पायथ्याशी  असलेल्या गोराडा धरणावर विसर्जनासाठी आलेल्या  गणरायांचे निर्माल्य गोळा करून पर्यावरण मित्रांनी  धरणाच्या स्वच्छतेबाबत निर्माल्याचे पावित्र्यही जपले. तालुक्यात ५ सप्टेंबर रोजी जामोद वगळता  गणरायांचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये मोठ- मोठे गणपती विसर्जनाकरीता पूर्णा नदीवर तथा  गोराडा धरणावर आणले होते. यावर्षी मोठय़ा प्रमाणात  पाणीटंचाई असल्याने आधीच धरणामध्ये केवळ २0  टक्के एवढाच जलसाठा आहे. त्यात विसर्जनाचे वेळी  हार-फुले, दहा दिवसांच्या दुर्वा व इतर पुजेचे साहित्य  या निर्माल्यासह धरणात विसर्जन करण्याची सर्वांची  दरवर्षीची परंपरा. परंतु गेल्या ४/५ वर्षापासून  पर्यावरण मित्र याठिकाणी हजर राहून सर्व निर्माल्य  गोळा करतात व त्याची योग्य विल्हेवाट लावतात.  त्यानुसार मंगळवारी दुपारपासून धरणावर एकत्र येवून  विसर्जनासाठी येणार्‍या गणरायांचे निर्माल्य पर्यावरण  मित्रांनी गोळा केले.यामुळे धरणातील पाण्याचे प्रदूषण टाळल्या गेले. तर  केवळ गणपतीच्या मूर्त्यांनाच पाण्यात नेवून विसर्जीत  करण्यात आले. आदिवासींच्या घराघरात आणि प्र त्येक गावात गणरायांची स्थापना झालेली असल्याने  जळगाव शहर, सुनगाव, गोराडा, निमखेडी, चारबन,  डुक्करदरी इत्यादी गावांमधून वाजत गाजत धरणावर  आणून जवळपास एक हजार गणेश मूर्तींचे या धरणात  विसर्जन करण्यात आले.  या धरणामधून जळगाव  शहराला पाणी पुरवठा होत असतो आणि हार-फुले,  दुर्वा इत्यादी पुजेचे साहित्य धरणात प्रवाहीत केल्याने  ते कुजते व सडते. परिणामी लाखो लिटर पाणी प्रदूषित  होते. त्याचा परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर हो तो. एवढेच नव्हे तर या परिसरातील आदिवासींच्या  आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. म्हणून पर्यावरण  मित्रांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाला सर्वांनी  भरभरून प्रतिसाद दिला. सर्वांनी धरणाकाठी पूजा  करून निर्माल्य पर्यावरण प्रेमींच्या स्वाधीन केले.  या तील प्लॅस्टीक पिशव्यांची होळी करून उर्वरीत  निर्माल्य पर्यावरण मित्रांनी एक शेतात विसर्जीत केले.  यासाठी सर्पमित्र शरद जाधव, इंजिनिअर सुनिल भग त, विकी मिश्रा, बाळु मानकर, चतुभरुज केला यांचेसह  अनेक पर्यावरण मित्रांनी परिश्रम घेतले.