शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या मध्यप्रदेशातील एकास दहा वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 11:25 IST

Buldhana Crime News, 10 years in prison विजय उर्फ गब्रू कैलास करोसिया यास दहा वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

ठळक मुद्देरायपूर पोलिस स्टेशनअंतर्गतच्या अल्पवयीन मुलीसंदर्भात हा प्रकार घडला होता.तीन ते चार महिन्यांतर पीडिता ही आरोपी विजय उर्फ गब्रु कैलास करोसिया याच्याकडे होती.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून मध्यप्रदेशात तिच्यावर जवळपास तीन ते चार महिने अत्याचार केल्याप्रकरणी बुलडाणा न्यायालयाने आरोपी विजय उर्फ गब्रू कैलास करोसिया यास दहा वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. बुलडाणा येथील जिल्हा सह न्यायाधिश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधिश बी. एस. महाजन यांनी हा निकाल दिला.रायपूर पोलिस स्टेशनअंतर्गतच्या अल्पवयीन मुलीसंदर्भात हा प्रकार घडला होता. १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही १ एप्रिल २०१९ रोजी सकाळी हातपंपावर पाणी आणण्यासाठी जाते म्हणून घरून निघाली होती. दरम्यान बराच कालावधी झाला तरी ती परत आली नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी परिसरात तिचा शोध केला. मात्र ती सापडली नाही. प्रकरणी पीडितेच्या वडीलांनी रायपूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात अपहरणाची तक्रार दिली होती. त्यानंतर जवळपास तीन ते चार महिन्यांतर पीडिता ही आरोपी विजय उर्फ गब्रु कैलास करोसिया याच्याकडे मध्यप्रदेशात असल्याची माहिती पीडित मुलीच्या वडीलांना मिळाली. मध्यप्रदेशातील पिपलानी पोलिस ठाण्याच्य हद्दीतून त्यांना ताब्यात घेण्यात आले. प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येवून सुनावणी झाली. त्यात १२ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडिता, तक्रारकर्ते, आदिवासी समाजाचे त्यावेळचे अध्यक्ष संदीप बरडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा चव्हाण, डॉ. निवृत्ती देवकर यांची साक्ष महत्त्वाची ठरली.  पप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधिश बी. एस. महाजन यांनी आरोपी विजय उर्फ गब्रू कैलास करोसिया याला दोषी ठरवत दहा वर्षे सश्रम कारावा व दोन हजार रुपये दंड ठोठावला. अन्य कलमानुसारही काही शिक्षा सुनावण्यात आल्या असून त्या आरोपीला एकत्र भोगावयाच्या आहेत. दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास अशीही तरतूद निकालात केली आहे.या प्रकरणात वादी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. सोनाली सावजी देशपांडे यांनी सरकार पक्षाची बाजू सक्षमपणे मांडली. त्यांना कोर्ट पैरवी एएसआय  सुरेश मोतीराम लोखंडे (रायपूर) यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा