मलकापूर : शहरातील उघडा मारूती मंदिराजवळच असलेल्या खदानवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या ३ मुलींपैकी दोघींचा पाय घसरल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे.कपडे धुत असताना तीन मुलींपैकी एकीचा पाय घसरल्याने ती खदानीतील पाण्यात बुडाली. मैत्रीण बुडत असल्याचे पाहून तिला वाचविण्याचा प्रयत्न दोघींनी केला. त्यांंचाही तोल जाऊन त्या दोघी पाण्यात पडल्या. ही घटना पाहताच स्थानिकांनी तात्काळ धाव घेतल्याने एकीला वाचविण्यात यश आले. मात्र, दोघी बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृत झालेल्यामध्ये म्हाडा कॉलनीतील रहिवासी कांचन बामंदे (वय-१४), शुभांगी दुतोंडे (वय-१०) या दोघींचा समावेश आहे. तर नेहा वानखडे (वय-१२) हिला वाचवण्यात नागरिकांना यश आले. माहिती मिळताच शहर पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. एपीआय श्रीधर गुट्टे यांनी खदानमध्ये सर्च आॅपरेशन राबवले. दोन्ही मृतक मुलींचे शव तेथील युवकाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.यावेळी समाधान ठाकूर, इश्वर वाघ, रतन बोराखडे उपस्थित होते. मुलींचे शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले
मलकापूर : खदानीत बुडून दोन मुलींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 11:07 IST
कपडे धुत असताना तीन मुलींपैकी एकीचा पाय घसरल्याने ती खदानीतील पाण्यात बुडाली.
मलकापूर : खदानीत बुडून दोन मुलींचा मृत्यू
ठळक मुद्दे मैत्रीण बुडत असल्याचे पाहून तिला वाचविण्याचा प्रयत्न दोघींनी केला.त्यांंचाही तोल जाऊन त्या दोघी पाण्यात पडल्या.स्थानिकांनी तात्काळ धाव घेतल्याने एकीला वाचविण्यात यश आले.