शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर : शिवसेनेचा हिसका; जाब विचारताच मका खरेदीस प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:16 IST

मलकापूर : शासकीय मका खरेदी केंद्रावर मका मोजमाप होत नसल्याने शे तकरी त्रस्त झाले होते. ही बाब शेतकर्‍यांनी निदर्शनास आणून देताच शिवसेना  तालुका प्रमुख विजय साठे यांनी खरेदी केंद्रावर धडक देत उपस्थित  अधिकार्‍यांशी चर्चा करीत सदर मोजमाप सुरू करण्यास भाग पाडले.

ठळक मुद्देशासकीय मका खरेदी केंद्रावर मोजमाप होत नसल्याने शेतकरी झाले होते त्रस्तशिवसेना तालुका प्रमुख विजय साठे यांच्या पुढाकाराने मका खरेदी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : शासकीय मका खरेदी केंद्रावर मका मोजमाप होत नसल्याने शे तकरी त्रस्त झाले होते. ही बाब शेतकर्‍यांनी निदर्शनास आणून देताच शिवसेना  तालुका प्रमुख विजय साठे यांनी खरेदी केंद्रावर धडक देत उपस्थित  अधिकार्‍यांशी चर्चा करीत सदर मोजमाप सुरू करण्यास भाग पाडले. त्यामुळे  २८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास मका खरेदी सुरू होऊन शे तकर्‍यांना दिलासा मिळाल्याचे चित्र राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील शासकीय  मका खरेदी केंद्रावर दिसून आले.जवळपास ४ ते ५ दिवसांपासून शेतकर्‍यांनी शासकीय मका खरेदी केंद्रावर  मका विक्रीस आणला आहे. असे असतानाही दुपारचे १ वाजले तरी मक्याचे  मोजमाप मात्र सुरू करण्यात आले नाही. ही बाब काही शेतकर्‍यांनी शिवसेना  तालुका प्रमुख विजय साठे यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविली असता, विजय  साठेंसह तालुका उपप्रमुख विनायक जवरे, जगन रायपुरे, ओंकारसिंह डाबेराव,  सुरेश अहिर, एकनाथ डोसे, श्रावण पाटील आदी पदाधिकार्‍यांनी थेट  शासकीय मका खरेदी केंद्रावर धडक दिली.यावेळी मका खरेदी केंद्रावर ताटकळत उभे असलेल्या शेतकर्‍यांशी शिवसेना  पदाधिकार्‍यांनी संवाद साधला. दरम्यान, या खरेदी केंद्रावर उद्भवत असलेल्या  अडचणींबाबत शेतकर्‍यांनी पदाधिकार्‍यांना अवगत करून दिले. यानंतर विजय  साठे यांनी उपस्थित केंद्रप्रमुख सुरेश झनके यांच्याकडे जाब विचारत आंदोलन  करण्याचा इशारा दिला. दरम्यान, सकाळपासून बंद असलेले मोजमाप   केंद्रावर सुरू करण्यात आले. यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला. 

शेतकर्‍यांना दिलासासदर शासकीय मका खरेदी केंद्रावर शेतकरी मोठय़ा प्रमाणात मका  विकण्यासाठी आणत असताना खरेदीस विलंब केला जात आहे. त्यामुळे शे तकर्‍यांना तासन्तास ताटकळत बसावे लागते. हा प्रकार रोजचाच झाला होता.  अखेर शिवसेनेच्या हिसक्याने खरेदी सुरळीत झाली.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाmalkapur bypassमलकापूर बायपास