शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खंडीत वीज पुरवठा जोडणी प्रकरण; मलकापूर नगराध्यक्ष हरिष रावळ यांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 13:59 IST

खामगाव : खंडीत केलेला विद्युत पुरवठा खांब्यावर चढुन जोडल्याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी मलकापूर नगराध्यक्ष अ‍ॅड. हरिष रावळ यांना सोमवारी सकाळी अटक केली.  

ठळक मुद्दे१९ सप्टेंबर २०१७ रोजी खांब्यावर चढुन नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ यांनी विद्युत पुरवठा सुरु केला होता. तब्बल ३ महिन्यानंतर नांदुरा पोलिसांनी नगराध्यक्ष अ‍ॅड. हरिष रावळ यांच्यासह तीघांना सोमवारी सकाळी अटक केली.

खामगाव : खंडीत केलेला विद्युत पुरवठा खांब्यावर चढुन जोडल्याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी मलकापूर नगराध्यक्ष अ‍ॅड. हरिष रावळ यांना सोमवारी सकाळी अटक केली.  नांदुरा तालुक्यातील तालुक्यातील धानोरा खुर्द, धानोरा बु, वडगांव या गावांचा पाणीपुरवठा महावितरणच्या अधिकाºयांनी सप्टेंबर २०१७ मध्ये खंडीत केला होता. त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पिण्याच्या पाण्याची कुठलीही पर्यायी व्यवस्था नसल्याने नागरिकांनी थेट मलकापूर नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीष रावळ यांच्याशी संपर्क साधला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने अ‍ॅड. हरिष रावळ यांनी महावितरणच्या अधिकाºयांशी संपर्क केला मात्र त्यांनी विद्युत पुरवठा जोडण्यास नकार दिला होता. त्यामुळे १९ सप्टेंबर २०१७ रोजी खांब्यावर चढुन नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ यांनी विद्युत पुरवठा सुरु केला होता. त्याची तक्रार २१ सप्टेंबरला नांदुरा पोलिस स्टेशनला पिंपळगाव राजाचे कनिष्ठ अभियंता विनायक बोतरकर यांनी दिली होती. त्यावरुन अप.क्रं. ४५६/१७ कलम १३८ विद्युत कायद्यान्वये नगराध्यक्ष अ‍ॅड. हरिष रावळ यांच्यासह शिवदास वनारे,बंटी उर्फ अमोल पाटील दोघे रा.धानोरा खु.यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल ३ महिन्यानंतर नांदुरा पोलिसांनी नगराध्यक्ष अ‍ॅड. हरिष रावळ यांच्यासह तीघांना सोमवारी सकाळी अटक केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाnagaradhyakshaनगराध्यक्ष