शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर : काळेगाव शिवारातील पूर्णेच्या पात्रातील रेती साठा जप्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:50 IST

मलकापूर : बोटीद्वारे अवैध उपसा उत्खनन केलेला दीड लाख रुपये किमतीचा ५0 ब्रास रेतीसाठा जप्त केल्याची कारवाई आज ४ वाजेच्या सुमारास महसूल प्रशासनाच्या पथकाने मौजे काळेगाव शिवारातील पूर्णा नदीपात्र परिसरात केली.

ठळक मुद्देदखल : बोटीतून होणार्‍या रेती चोरी विरोधात प्रशासनाने आवळला फास

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : बोटीद्वारे अवैध उपसा उत्खनन केलेला दीड लाख रुपये किमतीचा ५0 ब्रास रेतीसाठा जप्त केल्याची कारवाई आज ४ वाजेच्या सुमारास महसूल प्रशासनाच्या पथकाने मौजे काळेगाव शिवारातील पूर्णा नदीपात्र परिसरात केली.मौजे काळेगाव शिवारातील गट नं.१२ चे शेजारी पूर्णा नदीपात्रातून विनापरवानगी बसवलेल्या स्वयंचलित बोटीद्वारे अवैध उपसा करून रेतीसाठा उत्खनन सुरू असल्याची बाब महसूल प्रशासनाला समजली. त्याचप्रमाणे बोटीतून होत असलेल्या गौण खनिज चोरीप्रकरणी लाखो रुपयांची होतेय उलाढाल, या मथळ्याखाली ३१ डिसेंबर रोजी लोकमतने दखलपात्र वृत्तही प्रकाशित केले होते. त्यामुळे महसूल प्रशासन अधिक सजग झाले होते.परिणामत: आज दुपारी तहसीलदार विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार गजानन राजगडे, मंडळ अधिकारी पी.के.पाटील, तलाठी बी.के.जाधव, एस.जी. पारस्कर या चमूने काळेगाव परिसरात धाड टाकून दीड लाख रुपये किमतीचा ५0 ब्रास रेतीसाठा जप्त केल्याची धाडसी कारवाई केल्याने वाळू माफीयांमध्ये खळबळ उडाली आहे. 

अखेर महसूल विभाग कारवाईसाठी सरसावला!सरत्या वर्षात ३१ डिसेंबर रोजी अवैध गौण खनिज उत्खननाबाबत वृत्त प्रकाशित झाले. ‘त्या’ व्यवसायिकात एकच खळबळ उडाली. त्यामुळे कारवाईच्या धाकामुळे व्यवसाय दोन दिवस बंद होता; मात्र पुन्हा सुरू करण्यात आल्याने महसूल विभाग कारवाईसाठी सरसावल्याचे सांगितले जाते.

जिल्हाधिकार्‍यांनी पाठबळ द्याव!पूर्णेच्या पात्रातून अवैधरीत्या गौण खनिज उत्खनन संबंधित गावकर्‍यांच्या व परिसरातील नागरिकांच्या जीवावर बेतणार असेच आहे. स्थानीय अधिकारी हिंमत करतात. त्यांना कर्तव्यदक्ष जिल्हाधिकार्‍यांनी पाठबळ द्यावं जेणे करून अवैध काम बंद होऊ शकेल, असा सूर जनतेत उमटत आहे.

भागिदारीसाठी पुढार्‍यांची चढाओढ!अवैध गौण खनिज उत्खननात रग्गड पैसा मिळतो, या धरतीवर या व्यवसायात ऑफ द रेकॉर्ड भागिदारीसाठी पुढार्‍यांची जणू काही चढाओढच लागल्याचे चित्र मलकापूर परिसरात आहे. लोकप्रतिनिधीही त्यांना पाठीशी घालतायेत, हे विशेष.

टॅग्स :buldhanaबुलडाणा