शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नगरसेवकाची पाणीपुरवठा अभियंत्यास सभागृहातच मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 18:20 IST

Malkapur News : सनाउल्ला जमादार यांनी आचार्य यांना शिवीगाळ करीत त्यांच्या शर्टाची कॉलर धरून ओढाताण केली, तसेच त्यांच्या कानशिलात लगावत मारहाण

ठळक मुद्देसालीपुरा प्रभागातील जलवाहिनीचा मुद्दानगरसेवकाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर (बुलडाणा): सालीपुरा प्रभागातील जलवाहिनी प्रस्तावाच्या कारणास्तव काँग्रेसचे नगरसेवक सनाउल्ला जमादार यांनी पाणीपुरवठा अभियंता निनाद आचार्य यांना जाब विचारीत शिवीगाळ करून कानशिलात लगावल्याची घटना मंगळवारी दुपारी नगर परिषद सभागृहात घडली. याप्रकरणी अभियंत्याच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात नगरसेवक सनाउल्ला जमादार यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

नगर परिषदेच्या सभागृहात स्थायी समितीची बैठक संपल्यानंतर पदाधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत सालीपुरा प्रभागातील जलवाहिनी संदर्भात चर्चा सुरू होती. यावेळी नगरसेवक, स्थायी समिती सदस्य सनाउल्ला जमादार यांनी पाणी पुरवठा अभियंता निनाद आचार्य यांना जलवाहिनीचे काम पूर्ण आहे, असा प्रस्ताव पाठविण्याचे सूचित केले. काम पूर्ण झाले नाही, त्यामुळे प्रस्ताव पाठवू शकत नाही, असे उत्तर आचार्य यांनी दिले. त्यावर सनाउल्ला जमादार यांनी आचार्य यांना शिवीगाळ करीत त्यांच्या शर्टाची कॉलर धरून ओढाताण केली. तसेच त्यांच्या कानशिलात लगावत मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी पाणी पुरवठा अभियंता आचार्य यांनी थेट पोलिस स्टेशन गाठून नगरसेवक जमादार यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली. त्यांची वैद्यकीत तपासणी केली असता आचार्य यांच्या कानाच्या आतील भागात इजा झाल्याचे पुढे आले. त्यावरून शहर पोलीस स्टेशनला आरोपी जमादार विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास सपोनि शरद माळी करीत आहे.चौकट

 कर्मचा ऱ््यांसह पोहचले पोलिस ठाण्यातसभागृहात स्थायी समितीची सभा संपल्यानंतर पाणी पुरवठा अभियंता निनाद आचार्य हे नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ, उपाध्यक्ष रशीदखा जमादार व सभागृह लिपिक संजय मांडवेकर यांच्याशी चर्चा करीत होते. दरम्यान नगरसेवक सनाउल्ला जमादार यांनी त्यांच्या कानशिलात लगावली. या घटनेने सभागृहात एकच खळबळ उडाली. घडलेल्या घटनेचा निषेध करीत संपूर्ण नगर परिषद कर्मचारी पाणी पुरवठा अभियंता आचार्य यांच्यासोबत शहर पोलीस स्टेशनला दाखल झाले. दरम्यान नगराध्यक्षांसह पाणी पुरवठा सभापती अनिल गांधी या पदाधिकाऱ््यांनी प्रकरण आपसात मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरून याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.

टॅग्स :Malkapurमलकापूरbuldhanaबुलडाणा