मनोज पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीची निवडणूक ही गाव पातळीवर लढवल्या गेली. निवडणुकीत राजकीयपक्षाचे निवडणूक चिन्ह नसल्याने निवडून आलेले ११ सरपंच व ८९ सदस्य हे कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत ही बाब त्या निवडून आलेल्या व्यक्तीवरच अवलंबून आहे. मात्र व्यक्ती केंद्रीत असलेल्या या निवडणुकीत निवडून आलेला व्यक्ती हा कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्ष अथवा त्या पक्षाच्या नेत्यांशी जुळलेला असल्याने विजयानंतर त्या व्यक्तीला राजकीय पक्षाचे बिरुद लागणारच किंबहुना तसा दावा सुध्दा या पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच समप्रमाणात सरपंच पदावर वर्चस्व सिध्द केल्याचे दिसत आहे.भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष दादाराव तायडे पाटील यांनी वाकोडी, गोराड, पिंपळखुटा महादेव, पान्हेरा व झोडगा या ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपाने बाजी मारल्याचा दावा केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संतोषराव रायपुरे यांनी हरसोडा, अनुराबाद, काळेगाव, मोरखेड, निमखेड येथील सरपंचपद राकाँच्या ताब्यात आल्याचा दावा केला आहे. तर बहापूर ग्रा.पं.चे सरपंच हे आमच्या संपर्कात असल्याचेही संकेत संतोषराव राय पुरे यांनी दिले आहे. यामध्ये महत्वाचे म्हणजे झोडगा येथील सर पंच गणेश (नाना) नारखेडे हे भाजपाचा सहवासातून काँग्रेसवासी होत त्यांनी त्यांच्या पत्नीला पं.स.च्या सभापती पदी विराजमान केले होते. त्याचप्रमाणे भाराकाँ पक्षावर त्यांनी स्वत: नरवेल-धरणगाव या जि.प. सर्कलमधून त्यांच्या पत्नीला निवडणूक रिंगणात उभे केले होते. अशा परिस्थितीत ते भाजपाचे समर्थीत असा दावा आता केला जात आहे.
मलकापुर : भाजप-राष्ट्रवादीचा समान जागांवर दावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 01:02 IST
मलकापूर : तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीची निवडणूक ही गाव पातळीवर लढवल्या गेली. निवडणुकीत राजकीयपक्षाचे निवडणूक चिन्ह नसल्याने निवडून आलेले ११ सरपंच व ८९ सदस्य हे कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत ही बाब त्या निवडून आलेल्या व्यक्तीवरच अवलंबून आहे. मात्र व्यक्ती केंद्रीत असलेल्या या निवडणुकीत निवडून आलेला व्यक्ती हा कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्ष अथवा त्या पक्षाच्या नेत्यांशी जुळलेला असल्याने विजयानंतर त्या व्यक्तीला राजकीय पक्षाचे बिरुद लागणारच किंबहुना तसा दावा सुध्दा या पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच समप्रमाणात सरपंच पदावर वर्चस्व सिध्द केल्याचे दिसत आहे.
मलकापुर : भाजप-राष्ट्रवादीचा समान जागांवर दावा!
ठळक मुद्दे११ ग्रामपंचायतींसाठी पार पडली निवडणूक